• Download App
    त्यातून ममता बॅनर्जींचे संस्कार दिसतात, स्मृति इराणी यांचा हल्लाबोल|It shows Mamata Banerjee's Sanskaras, Smriti Irani's attack

    त्यातून ममता बॅनर्जींचे संस्कार दिसतात, स्मृति इराणी यांचा हल्लाबोल

    पश्चिम बंगालमध्ये वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दोषी ठरवत आहेत. यातून त्यांचे संस्कार दिसतात असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे.It shows Mamata Banerjee’s Sanskaras, Smriti Irani’s attack


    विशेष प्रतिनिधी 

    कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दोषी ठरवत आहेत. यातून त्यांचे संस्कार दिसतात असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे.

    इराणी म्हणाल्या, मला हे ऐकून धक्काच बसला की, महामारीसाठी त्या मोदीजी आणि अमित शाह यांना जबाबदार ठरवत आहेत. पण हेच ममता बॅनर्जी यांचे संस्कार आहेत. मोदीजी त्यांचा उल्लेख दीदी म्हणून करतात आणि त्या आमच्या नेत्यांसाठी सार्वजनिक व्यासपीठावरून अपशब्दांचा वापर करतात.



    जलपैगुडी येथील सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, जेव्हा करोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हा मोदी आणि शाह आले नाहीत. पण आता त्यांनी इथे बाहेरून लोकांना आणलंय व करोना वाढायला लागल्यावर पळून जात आहेत.

    पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने उपºयांना मोठ्या प्रमाणावर आणले आणि त्यामुळेच राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. इतके दिवस तुम्हे कुठे होतात? तुम्ही करोना आणलात आणि पळून गेलात.

    It shows Mamata Banerjee’s Sanskaras, Smriti Irani’s attack

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत