• Download App
    शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही, शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार चालवू शकतात, रावसाहेब दानवेंचा टोला|It is not my job to set fire to Shiv Sena, Eknath Shinde can run the state efficiently, says Raosaheb Danve

    शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही, शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार चालवू शकतात, रावसाहेब दानवेंचा टोला

    केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज जालन्यात नांदेड-हडपसर-पुणे एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आणि जिल्ह्यातील पहिल्या किसान रेल्वेचाही शुभारंभ करण्यात आला. या किसान रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्याचा 350 टन कांदा यावेळी आसाममध्ये पाठवण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.It is not my job to set fire to Shiv Sena, Eknath Shinde can run the state efficiently, says Raosaheb Danve


    प्रतिनिधी

    जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज जालन्यात नांदेड-हडपसर-पुणे एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आणि जिल्ह्यातील पहिल्या किसान रेल्वेचाही शुभारंभ करण्यात आला.

    या किसान रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्याचा 350 टन कांदा यावेळी आसाममध्ये पाठवण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.



    माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की, शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही, मी आग लावलेली नाही, शिंदे हे अनुभवी नेते आहेत. मनातली इच्छा ते बोलले नाहीत. शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार चालवू शकतात याचा मला विश्वास आहे. तत्पूर्वी, रावसाहेब दानवे यांनी आमच्यात आग लावण्याचं काम करू नये असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.

    यावर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी मनातली खरी इच्छा बोललेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे अनुभवी नेते असून पुन्हा मुख्यमंत्री आजारी पडल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचा चार्ज दिला पाहिजे.

    दरम्यान, यावेळी किसान रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्याचा 350 टन कांदा यावेळी आसाममध्ये पाठवण्यात आला. कमी वाहतूक खर्च आणि कमी वेळेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शेतीमाल बाहेरील राज्यात पाठवता येणार आहे. त्यामुळे किसान रेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे,

    अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय. दरम्यान 1 हजार कोटी रुपये खर्चून औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गाच दुहेरीकरण करणार असून या दुहेरी मार्गाच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाल्याची माहितीदेखील दानवे यांनी दिली आहे.

    दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद ते नांदेड मार्गाचे दुहेरीकरण केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. जालना-खामगाव या रेल्वेमार्गासाठी अंतिम सर्व्ह करण्याचं काम सुरू आहे, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. तर मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सर्व्हेक्षणाचं काम सुरू असून औरंगाबादमध्ये कार्यालयाचं काम सुरू करण्यात आलं असून आवश्यक जागा अधिग्रहण करण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा केली जाईल, असंही दानवे यावेळी म्हणाले.

    It is not my job to set fire to Shiv Sena, Eknath Shinde can run the state efficiently, says Raosaheb Danve

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य