• Download App
    कुंभमेळ्याची तुलना मरकझशी करणे अयोग्य, ते एका हॉलमध्ये राहिले, येथे २६ घाटांवर स्नानाच्या सुविधा , उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी टीकाकारांना सुनावले|It is inappropriate to compare Kumbh Mela with Markaz, they stayed in a hall, bathing facilities on 26 ghats here, Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat told critics

    कुंभमेळ्याची तुलना मरकझशी करणे अयोग्य, ते एका हॉलमध्ये राहिले, येथे २६ घाटांवर स्नानाच्या सुविधा , उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी टीकाकारांना सुनावले

    कुंभमेळ्याची तुलना दिल्लीमध्ये झालेल्या मरकझशी करणे चुकीचे आहे. कारण मरकझमध्ये लोक एकाच हॉलमध्ये झोपत होते. कुंभमेळा केवळ ऋषीकेशच नव्हे तर आजुबाजुच्या परिसरातही साजरा होत आहे. खुल्या वातावरणात होत आहे, अशा शब्दांत उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी टीकाकारांना सुनावले आहे.It is inappropriate to compare Kumbh Mela with Markaz, they stayed in a hall, bathing facilities on 26 ghats here, Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat told critics


    विशेष प्रतिनिधी 

    हरिद्वार : कुंभमेळ्याची तुलना दिल्लीमध्ये झालेल्या मरकझशी करणे चुकीचे आहे. कारण मरकझमध्ये लोक एकाच हॉलमध्ये झोपत होते. कुंभमेळा केवळ ऋषीकेशच नव्हे तर आजुबाजुच्या परिसरातही साजरा होत आहे. खुल्या वातावरणात होत आहे,

    अशा शब्दांत उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी टीकाकारांना सुनावले आहे.ऋषीकेश येथील कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होत आहेत. कोरोनाचे संकट असतानाही गर्दी होत आहे. त्यामुळे काही जणांकडून दिल्लीमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या तबलिगी जमातीच्या मरकझशी तुलना केली जात आहे.



    या टीकाकारांना उत्तर देताना रावत म्हणाले, कुंभमेळा हा ऋषीकेशपासून ते नीलकंठ क्षेत्रापर्यंत साजरा होत आहे. भाविकांना स्नानासाठी वेगवेगळे सोळा घाट आहेत. भाविक आणि साधु-संतांसाठी वेगवेगळ्या वेळा आहेत. हरिद्वार महाकुंभच्या दुसऱ्या शाही स्नानाचे आयोजन कोरोनाच्या गाईडलाईनचे पालन करून भव्यतेत साजरा झाला.

    रावत म्हणाले, शाही स्नानामध्ये संत समाजासह लाखो भाविकांनी स्नान करून पुण् कमावले. प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार सोमवती अमावस्येच्या दिवश्ी सकाळी आठ वाजेपर्यंतच १५ लाख भाविकांनी स्नान केले होते. दिवसभरात सुमारे ३५ लाख भाविकांनी स्नानाचा लाभ घेतला.

    मरकझशी कुंभमेळ्यााी तुलना अयोग्य असल्याचे सांगताना रावत म्हणाले, मरकझमध्ये एकाच हॉलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक खूप दिवस राहिले होते. एकाच रजईचा वापर करत होते. कुंभमेळ्यात लोक येऊन दर्शन आणि स्नानाचा लाभ घेऊन परत जातात. मरकझ आणि कुंभमेळ्यातील व्यवस्थांमध्ये फरक आहे. भाविकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

    It is inappropriate to compare Kumbh Mela with Markaz, they stayed in a hall, bathing facilities on 26 ghats here, Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat told critics

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त