• Download App
    ‘पेगॅसस’बाबत आता इस्राईली राजदूतांचे स्पष्टीकरण , एनएसओ सारख्या कंपन्यांना उत्पादने विकत नाही |Israyili ambeedoor spoke on pegasis

    ‘पेगॅसस’बाबत आता इस्राईली राजदूतांचे स्पष्टीकरण , एनएसओ सारख्या कंपन्यांना उत्पादने विकत नाही

     

    नवी दिल्ली – ‘एनएसओ’सारख्या कंपन्यांना त्यांची उत्पादने बिगर सरकारी आणि खासगी कंपन्यांना विक्री करण्याची परवानगी दिली जात नाही,’’ असे स्पष्ट मत इस्राईलचे भारतातील नवनियुक्त राजदूत नाओर गिलॉन यांनी मांडले.Israyili ambeedoor spoke on pegasis

    भारतामध्येही याच कंपनीने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा पाळत ठेवण्यासाठी वापर झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर केंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत.याबाबत विचारणा केली असता गिलॉन यांनी हा त्या देशाचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘‘ मी याबाबत फार खोलात गेलेलो नाही कारण ‘एनएसए’ ही खासगी इस्राईली कंपनी आहे.



    ‘एनएसओ’ला त्यांचे कोणतेही उत्पादन अन्य देशाला विकण्यापूर्वी इस्राईली सरकारची परवानगी घ्यावी लागते. स्पायवेअरच्या बाबतीत देखील हाच नियम लागू होतो केवळ सरकारलाच त्याची खरेदी करता येते. सध्या भारतामध्ये जे काही घडते आहे

    तो त्या देशाचा अंतर्गत प्रश्न् असून मला त्याकडे फारसे लक्ष द्यायचे नाही.’’ या स्पायवेअरच्या माध्यमातून भारतात विरोधी पक्ष नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि काही मंत्र्यांवर पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप होतो आहे.

    Israyili ambeedoor spoke on pegasis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत