उत्तर भारतात मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू होती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्यांचा शोध घेणाऱ्या दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ISIS च्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. शाहनवाज उर्फ शफी उज्जामा, मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद अर्शद वारसी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ISIS module busted in Delhi three suspected terrorists arrested
हा तो रिझवान नाही ज्याच्यावर एनआयएने ३ लाखांचे बक्षीस ठेवले आहे. तर शाहनवाज हा दिल्ली आणि पुणे ISIS मॉड्यूलचा ऑपरेटीव्ह असून तो पेशाने इंजिनिअर आहे. इतर दोघेही इसिसचे संशयित दहशतवादी असून ते उच्चशिक्षित आहेत. एनआयए बऱ्याच दिवसांपासून शाहनवाजचा शोध घेत होती. एनआयएने दहशतवादी शाहनवाजवर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तो पुणे इसिस प्रकरणात वॉन्टेड होता.
दिल्लीचा रहिवासी असलेला शाहनवाज हा व्यवसायाने इंजिनिअर आहे. पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्यानंतर तो दिल्लीत लपला होता. शाहनवाजची पत्नी आधी हिंदू होती. धर्मांतर केल्यानंतर तिला प्रथम इस्लामचा स्वीकार करायला लावला आणि नंतर कट्टरपंथी बनवण्यात आले. तीही शाहनवाजला साथ देत होती. पोलीस तिचा शोध घेत आहेत.शिवाय तिची बहीणही फरार आहे. शाहनवाजला उत्तर भारतात अनेक ठिकाणी तळ उभारून दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे उघडायची होती. तर ISIS च्या पुणे मॉड्यूलचा फरार दहशतवादी रिझवान हा दिल्लीतील दर्यागंजचा रहिवासी आहे, त्याची पत्नीही फरार आहे.
तिन्ही दहशतवादी दिल्लीत लपून बसल्याची माहिती NIA ला मिळाली होती.त्यानंतर रविवारी पोलिसांसह तपास यंत्रणेचे पथक छापे टाकण्यासाठी अनेक ठिकाणी पोहोचले होते पण कोणताही सुगावा लागला नाही. मोहम्मद शाहनवाज आलम उर्फ शफी उज्जामा उर्फ अब्दुल्ला, रिझवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्ला फयाज शेख या तीन दहशतवाद्यांचा तपास यंत्रणा आणि पोलीस शोध घेत होते.
इनाम असलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक शाहनवाज आता पोलिसांनी पकडला आहे. दिल्ली आणि इतर राज्यांतून ही अटक करण्यात आली आहे. पोलिस सर्वांची चौकशी करत आहेत. दहशतवाद्यांचे दिल्ली कनेक्शन समोर आल्यानंतर पोलीस आणि तपास यंत्रणांनी मध्य दिल्लीत छापा टाकला होता.
ISIS module busted in Delhi three suspected terrorists arrested
महत्वाच्या बातम्या
- PM मोदी आज राजस्थान-मध्य प्रदेश दौऱ्यावर; दोन्ही राज्यांना देणार 26 हजार कोटींच्या प्रकल्पांची भेट
- पुण्यात ससून रुग्णालयाच्या परिसरातून तब्बल 2.14 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा भंडाफोड
- आता तो दिवस दूर नाही, जेव्हा POK पुन्हा भारतात येईल” – व्ही.के.सिंह
- निवडणुकीपूर्वी जुन्या पेन्शनसाठी आंदोलन; दिल्लीत रामलीला मैदानात एकवटले सरकारी कर्मचारी