• Download App
    Donald Trump भारताच्या लॉबिंग नंतर डोनाल्ड ट्रम्पची खरंच चुकीची कबुली की तात्पुरती उपरती??

    भारताच्या लॉबिंग नंतर डोनाल्ड ट्रम्पची खरंच चुकीची कबुली की तात्पुरती उपरती??

    भारताच्या लॉबिंग नंतर डोनाल्ड ट्रम्पची खरंच चुकीची कबुली की तात्पुरती उपरती??, असा सवाल विचारायची वेळ डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमच्या वर्तणुकीतून समोर आली.

    भारतावर प्रचंड टेरिफ लादल्यानंतर दोन्ही देशांमध्ये जो व्यापारी तणाव उत्पन्न झाला त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ मध्ये काही सुधारणा केल्या. भारताबरोबर special relationship असल्याची मखलाशी केली. पण ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी भारतावरचे कटाक्ष दूर केले नाहीत. त्यामुळेच वर उल्लेख केलेला सवाल उत्पन्न झाला.

    भारताचे लॉबिस्ट ट्रम्प ला भेटले

    या दरम्यानच्या काळात भारताने कॉन्ट्रॅक्ट दिलेले लॉबिस्ट जेसन मिलर डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले. त्यांच्याशी त्यांनी काही विशिष्ट वाटाघाटी केल्या. मिलर यांनी x हँडलवर त्या भेटीचे फोटो शेअर केले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मधल्या पत्रकार परिषदेत भारताशी special relationship असल्याची कबुली दिली. टेरिफचा वाद तात्पुरता असल्याची मखलाशी केली. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या वक्तव्याला दुसरा देणारे ट्विट केले. पण ट्रम्प आणि मोदी यांच्यात कुठलीही चर्चा झाली नाही त्याचबरोबर मोदींनी अमेरिकेचा स्थगित केलेल्या दौरा पुन्हा चालू केला नाही. त्याचवेळी पीटर नावारो यांनी भारतावर टीका करणे थांबविले नाही.

     जरा जास्तच सकारात्मक निष्कर्ष

    पण ट्रम्प यांनी भारताविषयी काढलेले अनुकूल उद्गार आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या प्रतिसाद यावरून दोन्ही देशांमधल्या काही राजकीय विश्लेषकांनी आणि राजनैतिक तज्ञांनी मात्र जरा जास्तच सकारात्मक निष्कर्ष काढले. डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या चुकीची जाणीव झाली असावी. भारतावर ज्यादा टेरिफ लादून देखील अमेरिकेला अपेक्षित फायदा झाला नाही हे त्यांना समजले असावे म्हणून त्यांनी भारताविषयी काहीशी अनुकूल भूमिका का घेतली असावी, असा अंदाज भारताचे माजी राजदूत के. पी. फेबियन यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांना अनुकूल प्रतिसाद दिला, त्याविषयी सुद्धा फेबियन यांनी समाधान व्यक्त केले.



    शंकेला वाव

    पण ट्रम्प यांनी भारत याविषयी काढलेले अनुकूल उद्गार आणि त्यांनी टेरिफ मध्ये केलेले काहीसे बदल यामुळे ट्रम्प प्रशासन भारताला पूर्ण अनुकूल झाली की काय??, असा आभास निर्माण झाला असला, तरी ट्रम्प यांची दुसऱ्या टर्म मधली सगळी वागणूक आणि त्यांची दररोजची पत्रकार परिषद याचा अनुभव लक्षात घेता ते कधी उलटतील आणि पलटतील हे सांगण्यासारखी स्थिती उरलेली नाही. अमेरिकन प्रशासनाच्या धोरणात विशिष्ट सातत्य असले तरी ट्रम्प प्रशासनातले त्यांचे सल्लागार त्या धोरण सातत्यावर कायम राहतील याची कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही. शिवाय ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा सुद्धा थांबण्याची बिलकुल शक्यता नाही. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांना खरंच आपल्या चुकीची जाणीव होऊन त्यांनी त्याची कबुली दिली की त्यांना तात्पुरती उपरती झाली??, याविषयीची दाट शंका कायम आहे.

    Is Donald Trump really admitting wrongdoing after lobbying India or just a temporary reprieve?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Parliament : संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबरपर्यंत; 15 बैठका होतील

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- कायदेशीर भाषा सामान्य लोकांना समजेल अशी असावी; न्यायमूर्ती विक्रमनाथ म्हणाले- तुरुंगात असे 70% कैदी, जे अद्याप दोषी नाहीत

    पार्थ पवारचा घोटाळा, मधल्या मध्ये जय पवारचा पत्ता काटला??