• Download App
    IPL season 18 champion win RCB IPL मधल्या विजयाने RCB चा 18 वर्षांचा उपवास सुटला, विराट कोहलीला शांत झोप लागली!!

    IPL मधल्या विजयाने RCB चा 18 वर्षांचा उपवास सुटला, विराट कोहलीला शांत झोप लागली!!

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मधल्या विषयाने रॉयल्स चॅलेंजर बेंगलोरचा 18 वर्षांचा उपवास सुटला. दिग्गज क्रिकेटपटू फोटो विराट कोहली याला काल शांत झोप लागली. या भावना त्याने स्वतः बोलून दाखवल्या.

    आयपीएल सुरू झाल्यापासून रॉयल्स चॅलेंजर बँगलोर संघाला विजयाने कायम हुलकावणीच दिली होती. अगदी सेमी फायनल, फायनल पर्यंत पोहोचून देखील ही टीम कधी आयपीएल जिंकू शकली नव्हती. वास्तविक विराट कोहली सारखा विक्रमादित्य खेळाडू टीम मध्ये असून टीमचे भाग्य उजळत नव्हते.



    त्या उलट रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीम्स अनेकदा आयपीएल जिंकल्या. पण विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरु संघाला ती किमया साधता आली नव्हती. आयपीएल मध्ये ते कायम चोकर्स ठरत होते. पण काल अहमदाबाद मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब वर मात करून विराटच्या टीमने तब्बल 18 वर्षांनी आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले.

    रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने प्रथम फलंदाजी करून 190 धावा केल्या, ही फार मोठी धावसंख्या नव्हती पण टीमच्या गोलंदाजांनी किंग्स इलेव्हन पंजाबला १८४ धावांवर रोखले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरुचा टीम परफॉर्मन्स पंजाब पेक्षा भारी ठरला. विराट कोहलीच्या मस्तकावर आत्तापर्यंत अनेक विक्रमांचे तुरे खोवले गेले, पण आयपीएलच्या विजयाचा तुरा राहिला होता. तो काल त्याला मस्तकी धारण करता आला.

    IPL season 18 champion win RCB

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!