108 सूर्यनमस्कारांचं चॅलेंज घेतं चहात्यांनाही घालायला लावले सूर्यनमस्कार .
विशेष प्रतिनिधी
पुणे : आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. आज सर्वत्र योग दिन उत्साहात साजरा होताना दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते सर्वसामान्य नागरिकानं पर्यंत सगळेच योगासनानं करत योग दिन साजरा करत आहेत.यामध्ये मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलीवूड मधील नायक नाईकांचा देखील सहभाग आहे. International yoga day celebration.
आज अनेक सेलिब्रिटींनी योगा करतानाचे व्हिडिओज समाज माध्यमातून पोस्ट करत सर्वसामान्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि योग करण्याचा संदेश दिला आहे.
योग हा प्राचीन भारतीय संस्कृतीची आपल्या सगळ्यांना मिळालेली मोठी देणगी आहे. योग हा आपल्या आरोग्य साधनेतला मोठा समृद्ध असा वारसा आहे . आणि हा वारसा आता भारतीय संस्कृतीचा डंका वाजवत जगभर पोहोचला आहे तोचं वारसा जपण्याचं काम या योग दिनाच्या माध्यमातून केलं जातंय .
मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय आणि आपल्या लेखन कौशल्या बरोबरच फिटनेस फ्रिक म्हणून अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रसिद्ध आहे.आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून तिने तिची जीवनशैली आदर्श पद्धतीने बनवली आहे . आणि याचा प्रत्यय वेळोवेळी तिच्या समाज माध्यमातून ती शेअर करत असलेल्या व्हिडिओतून आणि लिहीत असलेल्या पोस्ट मधून येत असतो.
श्री श्री रविशंकर यांची शिष्या असलेली प्राजक्ता आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी कायमच योगाला प्राधान्य देत आलीय . ती तिच्या दैनंदिन जीवनामध्ये अष्टांग योगा करत असल्याच तिने सांगितलं आहे.
आज योग दिनाचे निमित्त साधतं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून 108 सूर्यनमस्कार घालत प्राजक्ताने योग दिन साजरा केला.एवढेच नाही तर थेट लाईव्ह सूर्यनमस्कार करत आपल्या चाहत्यांनाही तिने सूर्यनमस्कार घालणे भाग पाडले. प्राजक्ताचाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या विशेष विक्रमासाठी अनेकांनी तिचे कौतुकही केले आहे. गेल्यावर्षीही तिने हा विक्रम केला होता. विशेष म्हणजे पुरावा म्हणून याचा खास व्हिडिओ तीने शेयर केला आहे. सोबत एक खास कमेंटही तिने केली आहे.
International yoga day celebration.
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचले; भारतीय समुदायाकडून जल्लोषात स्वागत
- नव्या शैक्षणिक धोरणानुसार निर्माण होत असलेल्या पाठ्यपुस्तकांबाबत धर्मेंद्र प्रधान यांची विशेष माहिती
- ‘’…हे लक्षात आल्यानेच उद्धव ठाकरे बावचळल्यासारखे बोलताय’’ फडणवीसांनी लगावला टोला!
- 18 जुलै हाच खरा गद्दार दिन!!; आमदार संजय शिरसाट असे का म्हणाले??