• Download App
    सक्षमीकरण करण्याऐजवी काँग्रेसने सत्तेसाठी वाटली मोफत योजनांची खैरात, जे. पी. नड्डा यांचा आरोप|Instead of empowering, the Congress thought of free schemes for power. P. Nadda's allegation

    सक्षमीकरण करण्याऐजवी काँग्रेसने सत्तेसाठी वाटली मोफत योजनांची खैरात, जे. पी. नड्डा यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मागील 70 वर्षांत नागरिकांचे सक्षमीकरण करण्याऐवजी मते मिळवण्यासाठी काँग्रेसने मोफत योजनांची खैरात वाटली, असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला.Instead of empowering, the Congress thought of free schemes for power. P. Nadda’s allegation

    दिल्लीतील मॉडेल टाऊन येथे आयोजित सार्थक चौपाल या कार्यक्रमात बोलताना नड्डा म्हणाले,आत्मनिर्भर होण्यासाठी मोदी सरकारने देशातील नागरिकांना मदत केली. उज्ज्वला योजना आणि आयुष्मान भारत या आरोग्य योजनेच्या माध्यमातून त्यांचे सशक्तीकरण करण्यात आले. या योजनांच्या माध्यमातून भारतात झालेला बदल ठळकपणे दिसून आला आहे.



    काँग्रेसने मागील 70 वर्षांत काय केले, असा प्रश्न उपस्थित करताना, निवडणुकीत मते मिळवण्यासाठी या पक्षाने केवळ मोफत योजनांची खैरात वाटली. नागरिकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी काँग्रेसने मदत केली नाही.

    त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आली आणि त्यांनी 10 कोटी कुटुंबीयांना शौचालये उपलब्ध केली. देशातील गरजू आणि गरिबांना पैशांची गरज नाही तर, त्यांच्या सक्षमीकरणाची गरज आहे. आयुष्मान भारत योजनेचा देशातील 55 कोटी नागरिकांना लाभ मिळाला आहे.

    यामध्ये रिक्षाचालकांपासून ते इतर गरजू लोकांचा समावेश आहे. गावांचे विद्युतीकरण करण्यात आले, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आठ कोटी कुटुंबांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले. हे बदलत्या भारताचे चित्र आहे, असे नड्डा यांनी सांगितले

    Instead of empowering, the Congress thought of free schemes for power. P. Nadda’s allegation

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!