• Download App
    पाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी!! Instead of begging, give the world a nuclear bomb threat

    पाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी!!

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानी अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचून त्या देशाला सध्या भिकेचे डोहाळे लागले असताना त्या देशातली बौद्धिक दिवाळखोरही बाहेर आली आहे. पाकिस्तानी जनता एक वेळच्या जेवणासाठी मोताद असताना पाकिस्तानी जिहादी संघटनेचा म्होरक्या तिथल्या सरकारला कोणत्याही देशाकडे भीक मागण्यापेक्षा त्यांना अणुबाँम्ब हल्ल्याची धमकी देण्याचा अजब सल्ला दिला आहे. Instead of begging, give the world a nuclear bomb threat

    पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांचा दररोज जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान जगभरात कर्ज देण्यासाठी भीक मागत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील इस्लामी जिहादी संघटनेच्या नेत्याने पाकिस्तान सरकारला अजब सल्ला दिला आहे.

    काय म्हणाला अमीर हाफिज साद हुसेन रिझवी?

    पाकिस्तानने जगातील विविध देशांसमोर भीकेसाठी हात पसरण्याऐवजी एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात अणुबॉम्ब घेऊन जगाला धमकावले पाहिजे. असे केल्याने संपूर्ण जग पाकिस्तानच्या मागण्या मान्य करेल, असा अजब सल्ला पाकिस्तानमधील कट्टरपंथी गट तेहरीक-ए-लबाइकचा म्होरक्या अमीर हाफिज साद हुसेन रिझवी याने पाकिस्तान सरकारला दिला आहे.

    रिझवी याने जाहीर भाषणातून हा सल्ला दिला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओत रिझवी म्हणाला, अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी लष्कर प्रमुखांना समोर करून पाकिस्तान सरकार जगभरात सगळीकडे भीक मागत आहे. कुणी भीक घालते, तर कुणी भीक देत नाही. काही देश स्वत:चा फायदा बघत आहेत. पण तुम्ही जगाकडे भीक मागण्यासाठी का जात आहात? पाकिस्तान सरकार आणि लष्कराने उजव्या हातात कुराण आणि डाव्या हातात अणुबॉम्बचा बॉक्स घेऊन जगाला धमकावले पाहिजे. त्यामुळे संपूर्ण जग तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील.

    रिजवीच्या या सल्ल्यामुळे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फीकार अली भुट्टो यांच्या धमकीची आठवण झाली आहे. भारताने 1974 मध्ये अणुस्फोट केला, त्यावेळी पाकिस्तानलाही अणुस्फोट करण्याची खुमखुमी आली होती. त्यावेळी पंतप्रधान असलेले जुल्फीकार अली भुट्टो म्हणाले होते, की पाकिस्तानी जनता एक वेळ गवत खाऊन राहील पण अणुबाँम्बचा स्फोट करूनच दाखवेल. आज पाकिस्तान अणुशक्ती जरूर आहे पण त्या देशावर खरंच गवत खायची वेळ आली आहे आणि आता तिथला जिहादी संघटनेचा नेता पाकिस्तानी राज्यकर्त्यांना जगाला अणुबॉम्बची धमकी देण्याचा सल्ला देतो आहे.

    Instead of begging, give the world a nuclear bomb threat

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    EOS-09 satellite : भारतीय सैन्याला मोठी ताकद मिळणार, इस्रो EOS-09 उपग्रह प्रक्षेपित करणार

    भय बिनु होइ न प्रीति, लष्करी पत्रकार परिषदेत शिवतांडव’पासून ‘रामचरितमानस’चे दाखले देत पाकिस्तानला इशारा

    airports : देशातील ३२ विमानतळ नागरी उड्डाणांसाठी पुन्हा सुरू