विशेष प्रतिनिधी
दिल्ली : भारत आणि चीन या देशां मधील संघर्ष अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. नुकताच भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान खोऱ्यामध्ये युद्ध झाले. यामध्ये चीनने भारतीय सैनिकांवर वेगवेगळ्या आधुनिक शस्त्रांचा वापर करून हल्ला केला होता. या मध्ये बरेच भारतीय सैनिक जखमी झाले आहेत.
Inspired by conventional weapons, India developed new modern weapons to fight against China
तारांचे आवरण असलेल्या काठय़ांसह चीनने अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा वापर केला होता. ही शस्त्रे वापरण्याचा उद्देश हा होता की, सैन्याला फक्त जखमी करून सोडणे. त्यांचा जीव घेणे हा उद्देश न्हवता. त्यामुळे भारताने देखील यावर आता एक नवी युक्ती शोधून काढली आहे. नव्या शस्त्रास्त्र निर्मितीमुळे भारतीय जवानांना आता शत्रूशी दोन हात करताना बरीच मोठी मदत मिळणार आहे. नवीन विकसित करण्यात आलेली शस्त्रे ही भगवान इंद्राचं शस्त्र वज्र आणि भगवान शंकरांचे शस्त्र त्रिशूळ यांच्यापासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहेत.
अँपस्रोन कंपनीद्वारे ही शस्त्रे बनवण्यात आली आहेत. या कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी कुमार मोहिते यांनी सांगितले आहे की, गलवान खोऱ्यामध्ये चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर ताऱ्यांच्या काठ्यांचा आणि टेसर्स यांचा वापर केला होता. यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी देखील अशाप्रकारे जीव घेणार नाही पण शत्रूला जखमी करून सोडण्यात येईल अशी शस्त्रे बनवण्यावर भर दिला आहे.
पुढे ये असे म्हणाले, तर भारतातील पारंपरिक शस्त्रास्त्रांकडून प्रेरणा घेऊनच आम्ही नवीन शस्त्र विकसित केली आहेत. जी चीनच्या शस्त्रांपेक्षा अधिक घातक आहेत. खिळ्यांचा वापर करून धातूच्या काठ्या बनवल्या आहेत. याचा उपयोग असा होईल की शत्रूवर आक्रमक हल्ला केला तर शत्रू सैनिकांच्या बुलेटप्रूफ वाहनाचे टायर पंक्चर करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहेत. अशी माहितीदेखील कुमार मोहित कुमार यांनी या वेळी दिली आहे.
Inspired by conventional weapons, India developed new modern weapons to fight against China
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपनं बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेबही बेईमान झाले नसते’ ; गुलाबराव पाटील यांचा घणाघात
- सोमय्यायांना काश्मीर मध्ये पाठवा, दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ, संजय राऊत यांनी साधला निशाणा
- अहमदनगर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर येणार- राधाकृष्ण विखे पाटील
- महाविकास आघाडीतील सर्व मंत्र्यांना संजय राऊत यांचे आवाहन, गप्प बसू नका, टीकेला प्रतिटीका करा!