• Download App
    राज्यातील चित्रपटगृह चालकांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे । cinema operators in the state should starts only after conducting proper security checks Says CM Uddhav Thackeray

    राज्यातील चित्रपटगृह चालकांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    cinema operators : राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. cinema operators in the state should starts only after conducting proper security checks Says CM Uddhav Thackeray


    प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

    आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदींची उपस्थिती होती.

    विविध परवान्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाने सवलत द्यावी तसेच सिनेमा लायसेन्सचे विनामूल्य नुतनीकरण करून द्यावे, जीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकिटामागे 25 रुपये सर्व्हिस चार्जेस आकारण्यास परवानगी द्यावी, विद्युत वापर नसल्याने देयके मिनिमम वापरावर आधारित असू नये, मिळकत कर आकारू नये, अशा मागण्या करण्यात आल्या. असोसिएशनच्या वतीने नितीन दातार, निमेश सोमय्या, पूना एक्झिबिटर असोसिएशनचे सदानंद मोहोळ, अशोक मोहोळ, प्रकाश चाफळकर यांनी आपल्या मागण्या सादर केल्या.

    या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपल्या सोशल हँडलवर म्हटले की, कोरोना संक्रमाणाच्या पार्श्वभूमीवर एक पडदा चित्रपटगृह व्यावसायिकांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आर्थिक मदतीसह आपल्या विविध मागण्या या व्यावसायिकांनी समोर मांडल्या. चित्रपट प्रदर्शन व्यवसायास पुनरूज्जीवीत करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे या बैठकीत आश्वासित करण्यात आले.

    cinema operators in the state should starts only after conducting proper security checks Says CM Uddhav Thackeray

    Related posts

    Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होणार, प्रवाशांना मिळणार इंटरसिटीसारख्या सुविधा!

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले