Friday, 9 May 2025
  • Download App
    कार्यकर्त्यांना अमानुष वागणूक, तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताना भाजपा कार्यकर्त्यांचे केले मुंडण, सॅनीटायझर शिंपडून शुध्दीकरण|Inhuman treatment , shaving and sanitization of BJP workers while entering Trinamool Congress, purification by spraying sanitizer

    कार्यकर्त्यांना अमानुष वागणूक, तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताना भाजपा कार्यकर्त्यांचे केले मुंडण, सॅनीटायझर शिंपडून शुध्दीकरण

    जहाज बुडाल्यावर उंदीर पडतात त्याप्रमाणे पश्चिम बंगालमधील अनेक उपरे भाजपा कार्यकर्ते पुन्हा तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मात्र, तृणमूल कॉँग्रेसकडून त्यांना अमानुष वागणूक दिली जात आहे. अशाच प्रकारे भाजपातून तृणमूलमध्ये जाणाºया दीडशे कार्यकर्त्यांचे बीरभूम जिल्ह्यात यथासांग शुध्दीकरण करण्यात आले. मुंडण करून त्यांच्यावर सॅनीटायझरही शिंपडण्यात आले.Inhuman treatment , shaving and sanitization of BJP workers while entering Trinamool Congress, purification by spraying sanitizer


    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : जहाज बुडाल्यावर उंदीर पडतात त्याप्रमाणे पश्चिम बंगालमधील अनेक उपरे भाजपा कार्यकर्ते पुन्हा तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मात्र, तृणमूल कॉँग्रेसकडून त्यांना अमानुष वागणूक दिली जात आहे.अशाच प्रकारे भाजपातून तृणमूलमध्ये जाणाºया दीडशे कार्यकर्त्यांचे बीरभूम जिल्ह्यात यथासांग शुध्दीकरण करण्यात आले. मुंडण करून त्यांच्यावर सॅनीटायझरही शिंपडण्यात आले.

    बीरभूम जिल्ह्यातील लामबाजार विभागात हा प्रकार घडला. येथील स्थानिक तृणूमल कॉँग्रेसच्या नेत्याच्या म्हणण्यानुसार या कार्यकर्त्यांमध्ये भाजपा नावाच्या व्हायरसचा प्रवेश झाला होता. त्यामुळे सॅनीटायझर शिंपडून हा व्हायरस मारण्यात आला.



    या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दिसत आहे की भाजपामधून तृणमूलमध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते रांगेत चालत आहेत. तृणमूल कॉँग्रेसचे कार्यकर्ते सॅनीटायझर मशीन घेऊन त्यांच्यावर फवारे उडवत आहेत.

    यापूर्वी हुगळी जिल्ह्यात भाजपाच्या दोनशे कार्यकर्त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे मुंडन करण्यात आले होते. त्याचबरोबर गंगाजल शिंपडून त्यांचे शुध्दीकरणही करण्यात आले. त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले की आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला ही मोठी चूक होती. त्यामुळेच या चुकीचे प्रायाश्चित त्यांचे मुंडण करून देण्यात आले.

    तृणमूल कॉँग्रेसकडून कार्यकर्त्यांना दिल्या जाणाºया  या अमानुष वागणुकीचा सर्वत्र निषेध होत आहे. देशातील अस्पृश्यता प्रथा बंद झाली. मात्र, तरीही तृणमूल शुध्दीकरणासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत असल्याबाबत संताप व्यक्त होत आहे.

    Inhuman treatment , shaving and sanitization of BJP workers while entering Trinamool Congress, purification by spraying sanitizer

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL पुढे ढकलण्याची शक्यता, धर्मशालात सुरू असलेला पंजाब आणि दिल्ली सामनाही रद्द

    महत्त्वाची बातमी: भारत-पाकिस्तान तणाव शिगेला, युद्धासारख्या परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या!!

    Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!