विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमधून महाविकास आघाडीचा निर्धाराचा लढा; पण त्याचवेळी बीडमध्ये शिवस्वराज्य यात्रेत शरद पवारांच्या पक्षात राडा!!, असे राजकीय चित्र आज दिसले. ज्यावेळी मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांचा एकत्रित मेळावा होत होता, त्याचवेळी बीडमध्ये शिवस्वराज्य यात्रेचा समारंभ सुरू होता. षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचे सगळे नेते एकच हार घालून हात उंचावून ऐक्याची ग्वाही देत होते, तर त्याचवेळी बीडच्या शिवस्वराज्य यात्रेत शरद पवारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडून राडा घालत होते. Infighting among sharad pawar NCP in beed
षण्मुखानंद हॉलमधल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील या सगळ्या नेत्यांनी हातात हात घालून गळ्यात गळे घातले. सगळ्यांनी एक सूरात महायुतीच्या सरकारचा पाडाव करण्याचा निर्धार केला. उद्धव ठाकरेंनी जरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली, तरी शरद पवार आणि नाना पाटोले यांनी चतुराईने तिला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तरीदेखील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निर्धारात बदल झाला नाही. सगळ्यांनी महायुती सरकारचा पाडाव करायचा निर्धार केलाच.
पण एकीकडे महाविकास आघाडीचे सगळे बडे नेते हातात हात आणि गळ्यात गळे घालून महायुतीचा पाडाव करण्याचा निर्धार करत होते, त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बीड मधल्या तेलगावात एकमेकांविरोधात भिडले. माजी आमदारचा फोटो शिवस्वराज्य यात्रेचा पोस्टरवर लावला नाही म्हणून त्या आमदाराचे समर्थक चिडले आणि त्यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात राडा केला. या राड्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या. त्यानंतर स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वाद नसल्याचा खुलासे करायचा सपाटा लावला, पण जो काही राडा व्हायचा होता तो झालाच!!
बॅनरवर माजी आमदाराचा फोटो न लावल्यावरुन बीडच्या पवार गटाच्या सभेत राडा झाला. पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा बीड जिल्ह्यातील तेलगावात दाखल झाल्यानंतर हा राडा झाला. खासदार बजरंग सोनवणे यांचे स्थानिक कार्यकर्ते मनोहर डाके चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील शिवस्वराज्य यात्रेची जबाबदारी बजरंग सोनवणे यांच्यावर देण्यात आली आहे. या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बजरंग सोनवणे यांचा सत्कारही करण्यात आला. पण माजी आमदार राधाकृष्ण यांचा फोटो शिवस्वराज्य यात्रेच्या पोस्टर वर नव्हता म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी भर स्टेजवर जाऊन बजरंग सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे वाभाडे काढले. यात्रेतील राड्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या.
Infighting among sharad pawar NCP in beed
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi : विकसित भारताचा संकल्प ते वैद्यकीय शिक्षणाच्या वाढीव 75000 जागा; लाल किल्ल्यावरून काय म्हणाले मोदी??; वाचा!!
- Sheikh Hasina : पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतरही शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ
- Govind Mohan : वरिष्ठ आयएएस अधिकारी गोविंद मोहन यांची केंद्रीय गृहसचिव म्हणून नियुक्ती!
- Vinesh Phogat : CASने विनेश फोगटची केस फेटाळली, रौप्य पदक मिळणार नाही!