वृत्तसंस्था
नवी दिल्ली : इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये आई-वडिलांविषयी अश्लील शेरेबाजी करून महिलांविषयी अभद्र भाषेचा वापर करणाऱ्या युट्युबर रणवीर अलाहाबादिया याच्यासह चौघांनी राष्ट्रीय महिला आयोगासमोर माफीनामा सादर केला. रणवीर सह चार आरोपी काल राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर झाले आणि त्यांनी अश्लील शेरेबाजीबद्दल खेद व्यक्त करत महिला आयोगासमोर माफीनामा सादर केला, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. Four people including Ranveer Allahabadia submit apology to National Commission for Women!!
इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलानी, अपूर्वा मखिजा, समय रैना, जसप्रीत सिंग यांच्यासह दोघांवर अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात देशभरातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी या सगळ्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. सुप्रीम कोर्टाने देखील रणवीर अलाहाबादिया याच्या केसवर जामीनाचा निर्णय देताना तुमच्या डोक्यात असली घाण येऊच कशी शकते??, असा बोचरा सवाल करून सगळ्यांना फटकारले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या गंभीर प्रकरणाची दखल घेत या सर्व आरोपींना नोटीस बजावली होती. सुरुवातीला महिला आयोगासमोर हजर राहण्यात त्यांनी टाळाटाळ केली होती. त्यांनी आयोगाकडे हजर राहण्यासाठी मुदत मागितली होती. त्यानुसार महिला आयोगाने त्यांना ६ मार्चची मुदत दिली होती. त्यानुसार रणवीर अलाहाबाद यासह चार आरोपी काल महिला आयोगासमोर हजर झाले. त्यांनी आपल्या जुन्या वक्तव्याबद्दल आणि अश्लील शेरेबाजी बद्दल खेद व्यक्त करत महिला आयोगासमोर माफीनामा सादर केला.
आमच्याकडून जे वक्तव्य झाले, ती चूक होती. अशी चूक पुन्हा आम्ही कधीच करणार नाही. महिलांच्या सन्मानासंदर्भात कुणाच्या भावना दुखावतील, अशी टीका टिप्पणी इथून पुढे आमच्याकडून होणार नाही, अशी ग्वाही रणवीर अलाहाबादिया याच्यासह चौघांनी दिली. त्याचबरोबर इथून पुढच्या शोमध्ये महिला सन्मानासाठी पोषक अशाच कार्यक्रमांचा आणि कंटेण्टचा समावेश करू, असे रणवीर अलाहाबादिया याने महिला आयोगासमोर सांगितले, असे विजयाताई रहाटकर यांनी नमूद केले. मात्र, त्याचवेळी जी काही पुढची कारवाई होईल, ती कायद्यानुसार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
India’s Got Latent case : Four people including Ranveer Allahabadia submit apology to National Commission for Women!!
महत्वाच्या बातम्या
- Suresh Dhas मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेला आमदार सुरेश धस यांचा आशीर्वाद!
- S Jaishankar : एस. जयशंकर यांनी काश्मीरबद्दल लंडनमध्ये असे काही म्हटले की, पाकिस्तान चवताळला!
- Babur Khalsa : ‘बाबर खालसाचा दहशतवादी महाकुंभात दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत होता’
- Tahawwur Hussain Rana : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा भारतात येण्यास घाबरतोय, कारण…