वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2023-24च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर 7.8% होता. तथापि, रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) ते 8% आणि रेटिंग एजन्सी ‘आयसीआरए’ने 8.5% असण्याचा अंदाज वर्तवला होता. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा विकास दर सर्वाधिक वेगाने वाढला. सरकारी आकडेवारीनुसार, हा विकास दर गाठण्यात कृषी आणि वित्तीय क्षेत्रांचा सर्वाधिक वाटा आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनने (एनएसओ) गुरुवारी ही आकडेवारी जाहीर केली.India’s GDP in the April-June quarter was the highest in the world at 7.8 percent; China’s growth rate is only 6.3 percent
सध्याच्या किमतींवर आधारित नाममात्र जीडीपी वृद्धीचा दर 8% होता. 2022-23 मध्ये हा दर 27.7% होता. सेवा क्षेत्रातील वाढत्या मागणीचा जीडीपीमध्ये मोठा वाटा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विमान आणि रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. हवाई प्रवासी वाढले याचा अर्थ शहरी भागातून मागणी वाढली असे नाही. यामध्ये ग्रामीण भागचाही सहभाग व प्रवासीसंख्या वाढली आहे. रिझर्व्ह बँकेने संपूर्ण वर्षासाठी 6.5% विकास दराचा अंदाज वर्तवला आहे.
व्यापार तूट 33% घटली, आता ती 1.66 लाख कोटी रुपये
2023-24च्या पहिल्या तिमाहीत सकल घरेलू उत्पादन 40.37 लाख कोटी होते. गेल्या वेळी ते 37.44 लाख कोटी होते. या आधारावर पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ 7.8% होती. 2022-23च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वृद्धी 13.1% होती. प्रचलित किमतींवर आधारित किमान जीडीपी 70.67 लाख कोटी रुपये आहे. 2022-23 मध्ये याच कालावधीत ते 65.42 लाख कोटी रुपये होते.
एकूण कर संकलन 2,63,212 कोटी रुपये होते. 2022-23 मध्ये ते 2,44,445 कोटी होते. करवाढ 7.7% आहे. गेल्या वर्षी 2022-23 ती 32.3% होती. पहिल्या तिमाहीत आयात 23.8% वाढली. एकूण 16.78 लाख कोटी रुपयांची आयात आणि 15.12 लाख कोटी रुपयांची निर्यात झाली. एकूण व्यापार तूट 1.66 लाख कोटी रुपये होती. गेल्या वर्षी ती 2.48 लाख कोटी रुपये होती.
India’s GDP in the April-June quarter was the highest in the world at 7.8 percent; China’s growth rate is only 6.3 percent
महत्वाच्या बातम्या
- नेहरूंचा इंदिराजींनी सोडून दिलेला वारसा मोदी पुढे घेऊन जातायेत, तरी काँग्रेससह सर्व विरोधकांचा आक्षेप??
- मुंबईत “इंडिया” आघाडीचा “मास्टर स्ट्रोक”; तर दिल्लीत मोदींचा “ग्रँडमास्टर स्ट्रोक”!!
- मराठमोळे अजय पुरकर आता टॉलीवूड गाजवणार ! दक्षिणात्य हिरो व्हीलन समोर मोठ आवाहन!
- संसदेच्या विशेष अधिवेशनातून विरोधकांना “भूल”, की “एक देश एक निवडणुकीची” चाहूल?