वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : कोरोना संकटाशी झगडत असलेल्या भारताला मदतीसाठी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी ४७ लाख डॉलरचा निधी उभा केला आहे. निधी उभारण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केल्यानंतर १०० तासांच्या आत ६६ हजार ७०० हून अधिक भारतीय वंशाच्या नागरिकांनी ४७ लाख डॉलरचा निधी गोळा केला. Indians from USA collects money to help India
‘एकत्रित प्रयत्नांतून हजारो जणांचे जीव वाचविता येतील, अनेकांना मदत मिळेल आणि भारताला कोरोनाविरोधातील लढाईत बळ येईल,’ असे निधी उभारणाऱ्या ‘सेवा फौंडेशन’ने म्हटले आहे.
या संस्थेने भारतात पाठविण्यासाठी २,१८४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सज्ज ठेवले आहेत. सेवा फौंडेशनही अमेरिकेतील भारतीयांची सर्वांत मोठी सेवाभावी संस्था आहे. हा निधी सोशल मीडियाच्या माध्यमातून जमा करण्यात आला आहे.
याशिवाय अनेक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही गोळा करण्यात आले आहेत. भारतात ऑक्सिजनचा वेगाने पुरवठा करणे, हे आमचे प्राथमिक उद्दीष्ट असल्याचे या संस्थेने सांगितले. या संस्थेचे स्वयंसेवक रुग्णवाहिक, रुग्णालयांतील खाटांची परिस्थिती याबाबत माहिती देणारा डिजीटल हेल्प डेस्कही तयार केला जात आहे.
Indians from USA collects money to help India
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीतील केजरीवाल सरकारलाच लोक मरताना पाहायचेत, रेमडेसिव्हीरच्या प्रोटोकॉलवर उच्च न्यायालय भडकले
- ‘सिंघम’ ची साथ : कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात; मुंबई महानगरपालिकेला दिले १ कोटी
- Maharashtra Corona Update : राज्यात ९८५ मृत्यू, तर ६३ हजार ३०९ जणांना कोरोनाची लागण २४ तासांतील भयावह चित्र
- घर सुधरेना पण संजय राऊत यांना उत्तर प्रदेशची चिंता, उध्दव ठाकरेंची ओवाळत म्हणाले कोरोनाविरुध्द लढण्याचे महाराष्ट्र मॉडेल