• Download App
    QRSAM भारतीय लष्करी सामर्थ्य वाढणार! लवकरच मिळणार

    QRSAM’ : भारतीय लष्करी सामर्थ्य वाढणार! लवकरच मिळणार अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली ‘QRSAM’

    QRSAM

    संरक्षण मंत्रालय लवकरच या क्षेपणास्त्र प्रणालीसाठी ३० हजार कोटी रुपयांच्या कराराला मान्यता देणार आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – QRSAM’भारतीय लष्कराला लवकरच एक नवीन हवाई संरक्षण प्रणाली मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शत्रूचे कोणतेही क्षेपणास्त्र, ड्रोन भारताच्या सीमेवरून सहज पाडले जाईल.QRSAM’

    संरक्षण मंत्रालय सैन्यासाठी नवीन स्वदेशी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या (QR-SAM) QR-SAM प्रणालीच्या तीन रेजिमेंट खरेदी करण्याचा विचार करत आहे. हा करार ३०,००० कोटींचा असणार आहे. तर प्राप्त माहितीनुसार, संरक्षण मंत्रालय लवकरच या क्षेपणास्त्र प्रणालीसाठी ३० हजार कोटी रुपयांच्या कराराला मान्यता देणार आहे. भारतीय हवाई संरक्षण प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे



    केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण परिषद, या महिन्याच्या अखेरीस अत्यंत आधुनिक मोबाइल QR-SAM प्रणालीसाठी आवश्यकतेस मान्यात(AON) देण्याचा विचार करेल, जी प्रणाली २५-३० किमी अंतरापर्यंत शत्रूची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन रोखण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

    ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्यांसाठी वापरलेले तुर्की ड्रोन आणि चिनी क्षेपणास्त्र भारताने हाणून पाडले. पाकिस्तानचा हल्ला उधळण्यात भारताच्या विद्यमान बहुस्तरीय हवाई संरक्षण नेटवर्कने महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर लगेचच आता हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

    Indian military power will increase Soon we will get the latest air defense system ‘QRSAM’

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात बिहार SIR मुद्द्यावर विरोधकांचा गदारोळ, कोस्टल शिपिंग विधेयक राज्यसभेत मंजूर

    ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन

    AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार