• Download App
    भारतीय हवामान विभाग : गुजरातमध्ये दिला अतिवृष्टीचा इशारा , शेतकरी आणि मच्छिमारांना दिली ' ही ' माहिती ; 'या ' जिल्ह्यांना दिला ऑरेंज आणि यलो अलर्ट । Indian Meteorological Department: Warning of heavy rains in Gujarat, farmers and fishermen given 'this' information; Orange and Yellow alerts issued to 'this' districts

    भारतीय हवामान विभाग : गुजरातमध्ये दिला अतिवृष्टीचा इशारा , शेतकरी आणि मच्छिमारांना दिली ‘ ही ‘ माहिती ; ‘या ‘ जिल्ह्यांना दिला ऑरेंज आणि यलो अलर्ट

    भारतीय हवामान विभाग (IMD) ने १ आणि २ डिसेंबर रोजी गुजरातच्या काही भागात खूप मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. Indian Meteorological Department: Warning of heavy rains in Gujarat, farmers and fishermen given ‘this’ information; Orange and Yellow alerts issued to ‘this’ districts


    विशेष प्रतिनिधी

    गुजरात : सध्या पावसाने सगळीकडेच हजेरी लावली आहे.दरम्यान भारतीय हवामान विभाग (IMD) ने १ आणि २ डिसेंबर रोजी गुजरातच्या काही भागात खूप मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. IMD ने १ डिसेंबर रोजी गुजरातमधील आणंद, भरुच, नवसारी, वलसाड, अमरेली आणि भावनगर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि २ डिसेंबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे.

    सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, काल ३० नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान काल रात्रीपासूनच उत्तर पश्चिम आणि लगतच्या मध्य भारतावर त्याचा परिणाम दिसला आहे.त्याचबरोबर ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उत्तर आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर मच्छिमारांना न जाण्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांसाठी आणि अवकाळी पावसामुळे उभ्या राहिलेल्या पिकांसाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



    आयएमडीने सांगितले की,१ डिसेंबर रोजी आनंद, भरूच, नवसारी, वलसाड, सुरत, डांग आणि तापी, अमरेली, जुनागढ, गीर सोमनाथ, बोटाड आणि सौराष्ट्र जिल्ह्यातील भावनगर तसेच पंचमहाल, दाहोद, छोटा उदेपूर येथे अतिवृष्टीची शक्यता आहे. आहे. तर दुसरीकडे २ डिसेंबर रोजी बनासकांठा, साबरकांठा, अरवली, महिसागर, डांग आणि तापी या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उत्तर गुजरात किनारपट्टी आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर ४० – ५० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग येण्याची शक्यता आहे.तसेच जाखाऊ, मांडवी (कच्छ), मुंद्रा, न्यू कांडला, नवलखी, जामनगर, सलाया, ओखा आणि पोरबंदरसह उत्तर गुजरातच्या किनारपट्टीवर मच्छिमारांना कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

    Indian Meteorological Department: Warning of heavy rains in Gujarat, farmers and fishermen given ‘this’ information; Orange and Yellow alerts issued to ‘this’ districts

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य