वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जगभरात ॲपल कंपनीच्या आयफोनची करीत असताना भारतीयांसाठी मात्र एक विश्वासनीय ब्रँड आयफोन निर्मितीत पुढे येत आहे. आता ॲपलच्या आयफोनवर “टाटा निर्मित” असा शिक्का उमटणार आहे. टाटा समूह अडीच वर्षांत देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी ॲपलचे आयफोन भारतात बनवण्यास सुरुवात करेल, असे ट्विटर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केले आहे.Indian faith will emerge on iPhone flower Tata to manufacture iPhone in India!!
ग्लोबल इंडियन इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या विकासासाठी संपूर्ण पाठिंबा देत आहोत. भारताकडून जागतिक इलेक्ट्रॉनिक ब्रँड्सचे समर्थनदेखील करण्यात येत आहे. भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स बाजारात शक्तीशाली बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ध्येय साकार करायचे आहे, असे राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.
विस्ट्रॉन फॅकट्री कर्नाटकच्या साउथईस्टमध्ये आहे. रिपोर्टनुसार, मार्च 2024 पर्यंत विस्ट्रॉनच्या फॅक्टरीमध्ये जवळपास 1.8 बिलियन डॉलरच्या Apple iPhone बनवणार आहे. टाटा या फॅक्टरीमध्ये ग्लोबल मार्केटसाठी iPhone 15 चे मॅन्युफॅक्चरिंग करण्यात येणार आहे. विस्ट्रोन फॅक्टरीचे एकूण मुल्य हे 600 मिलियन डॉलर इतके आहे. गेल्या एक वर्षांपासून याबाबत बोलणं सुरू होतं. या फॅक्टरीमध्ये आयफोन 14 मॉडलचे मॅन्युफॅक्चरिंगसाठी केले होते. या फॅक्टरीत जवळपास 10,000 हून जास्त कर्मचारी काम करतात.
विस्ट्रॉन फॅक्टरीत तोट्यात जात होती. ॲपलच्या अटींनुसार कंपनीला तोटा सहन करावा लागत होता. विस्ट्रॉनच्या म्हणण्यानुसार, Apple ला फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉनपेक्षा जास्त मार्जिन दिले जाते. त्याचवेळी चीनच्या तुलनेत भारतात वेगवेगळी आव्हाने आहेत. त्यामुळे भारतात काम करणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत विस्ट्रॉन आपली कंपनी विकणार असल्याचे समोर आले होते. लवकरच टाटाचा ॲपलशी
करार प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे.
टाटा हा भारतातील विश्वासनीय ब्रँड आहे. मीठापासून ते तंत्रज्ञानापर्यंत टाटा वस्तू तयार करते. गेल्या 155 वर्षांपासून टाटा भारतातील तळागाळातील लोकापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे भारतात जर आयफोनचे उत्पादन होणार असेल तर भारतीयांसाठी ही मोठी गोष्ट असेल.
Indian faith will emerge on iPhone flower Tata to manufacture iPhone in India!!
महत्वाच्या बातम्या
- धोनी पैसे वाटतोयच्या नावाखाली महिलेला फसवून दीड वर्षांच्या मुलीचे अपहरण!!
- तीन तलाक विरोधी कायद्यानंतर आता मोदी सरकारची लव्ह जिहाद विरोधातही कायद्याची तयारी!!
- पॅराबोलिक ड्रग प्रकरणात मोठी कारवाई: पीएमएलए अंतर्गत पाच शहरांमध्ये १७ ठिकाणी EDचे छापे
- इस्त्रायल-हमास युद्धात अमेरिकेची एन्ट्री; सीरियात इराण समर्थित दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जोरदार ‘एयर स्ट्राइक’