Sunday, 4 May 2025
  • Download App
    भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टरच्या वापरावर निर्बंध, मुंबईतील इमर्जन्सी लँडिंगनंतर घेतला निर्णय|Indian Army restricts use of Dhruva helicopters, decision taken after emergency landing in Mumbai

    भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टरच्या वापरावर निर्बंध, मुंबईतील इमर्जन्सी लँडिंगनंतर घेतला निर्णय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचे बुधवारी मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्याचवेळी या अपघातानंतर संरक्षण दलाने एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरच्या उड्डाणावर तत्काळ बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरच्या अपघाताचे कारण कळत नाही तोपर्यंत हेलिकॉप्टर थांबवले जाईल. भारतीय तटरक्षक दलासह आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स एएलएच हेलिकॉप्टर चालवतात.Indian Army restricts use of Dhruva helicopters, decision taken after emergency landing in Mumbai

    हे प्रगत हलके हेलिकॉप्टर (एएलएच) ध्रुव हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने तयार केले आहे. हे ध्रुव हेलिकॉप्टर लष्कराचे जवान आणि साहित्याच्या वाहतुकीसाठी वापरले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंदुस्तान एअरोनॉटिक्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरचे ऑपरेशन थांबू नये यासाठी कंपनी लवकरच प्रयत्न करेल.



    ध्रुवचे इमर्जन्सी लँडिंग

    बुधवारी भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर ध्रुवचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. घटनेनंतर या हेलिकॉप्टरमधील 3 जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरने मुंबई किनार्‍याजवळ अरबी समुद्रात पाण्यावर आपत्कालीन लँडिंग केले. यानंतर नौदलाने तातडीने बचाव मोहीम राबवून तीन क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका केली.

    Indian Army restricts use of Dhruva helicopters, decision taken after emergency landing in Mumbai

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू

    Igla S missile : भारतीय लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळाले

    Manoj Tiwari : मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला!