वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. लष्करी क्षमतेच्या बाबतीत अमेरिका सर्वात शक्तिशाली देश आहे. संबंधित डेटा ठेवणाऱ्या वेबसाइट ग्लोबल फायरपॉवरने जगातील 145 देशांच्या सैन्याच्या क्षमतेचे विश्लेषण करून ‘मिलिटरी स्ट्रेंथ लिस्ट-2024’ रँकिंग जारी केली आहे.Indian Army ranked 4th in the world, Pakistan 9th; India has 3 times more army, tanks-fighter jets than Pakistan
या यादीत रशिया दुसऱ्या तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये 60 पेक्षा जास्त पॅरामीटर्सच्या आधारे रँकिंग करण्यात आली आहे. यामध्ये सैनिकांची संख्या, शस्त्रास्त्रे, वित्त, स्थान आणि संसाधने या बाबी लक्षात ठेवण्यात आल्या आहेत. या यादीनुसार, पाकिस्तानकडे जगातील 9व्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे.
भारताकडे 25.27 लाख पॅरा मिलिटरी सैनिक आहेत
पाकिस्तानशी तुलना केल्यास भारताकडे त्यांच्यापेक्षा तिप्पट सैनिक आहेत. पाकिस्तानच्या तुलनेत भारताकडे पॅरा मिलिटरी फोर्सही जास्त आहेत. भारताच्या निमलष्करी दलात 25,27,000 सैनिक आहेत. तर पाकिस्तानात त्यांची संख्या फक्त पाच लाख आहे. भारताकडे 4,641 रणगाडे आणि 606 लढाऊ विमाने आहेत. तर पाकिस्तानकडे 3,742 रणगाडे आणि 387 लढाऊ विमाने आहेत.
नौदल क्षमतेच्या बाबतीतही पाकिस्तान आपल्यापेक्षा खूप मागे आहे. मात्र, पाकिस्तानकडे 57 अटॅक हेलिकॉप्टर आहेत, तर भारताकडे फक्त 40 आहेत. ग्लोबल फायर पॉवरने पॉवर इंडेक्सनुसार देशांची ही रँकिंग ठरवली आहे. देशाच्या एकूण फायर पॉवरला पॉवर इंडेक्स म्हणतात. एखाद्या देशाचा पॉवर इंडेक्स जितका कमी असेल तितके त्याचे सैन्य अधिक शक्तिशाली असेल.
भूतान हा सर्वात कमी लष्करी क्षमता असलेला देश आहे
यामध्ये अमेरिकेचा पॉवर इंडेक्स 0.0699 आहे. तर भारताचा पॉवर इंडेक्स 0.1023 आहे. आकडेवारीनुसार, पाकिस्तानचा पॉवर इंडेक्स 0.1711 आहे. ग्लोबल फायर पॉवरनुसार भूतानचे सैन्य हे जगातील सर्वात कमकुवत सैन्य आहे. भूतानचा पॉवर इंडेक्स 6.3704 आहे.
यानंतर मोल्दोव्हा 144व्या, सुरीनाम 143व्या, सोमालिया 142व्या आणि बेनिन 141व्या क्रमांकावर आहे. या यादीत लायबेरिया 140व्या, बेलीज 139व्या आणि पश्चिम आफ्रिकेचा देश सिएरा लिओन 138व्या क्रमांकावर आहे. मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक 137 व्या आणि आइसलँड 137 व्या क्रमांकावर आहे.
Indian Army ranked 4th in the world, Pakistan 9th; India has 3 times more army, tanks-fighter jets than Pakistan
महत्वाच्या बातम्या
- निवडणुकीपूर्वी हरियाणा काँग्रेसमध्ये पुन्हा फूट; हुड्डा आणि शैलजा यांची स्वतंत्र यात्रा
- दिल्ली मद्य धोरण प्रकरण: केजरीवाल चौथ्यांदा EDसमोर हजर होणार नाहीत!
- “पुरोगामीत्वा”च्या स्वलिखित नोंदी; रामविरोधाच्या “ऐतिहासिक चुकीची” कबुली!!
- 300 विमाने उड्डाणाच्या प्रतीक्षेत, दोन दिवसांत प्रवासी संख्या तब्बल 40 हजारांनी घटली!