• Download App
    Operation Sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी,

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!

    Operation Sindoor

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Operation Sindoor ऑपरेशन सिंदूर मध्ये 7 ते 10 मे 2025 या चार दिवसांमध्ये भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानात केलेल्या कारवाईत 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले त्याचबरोबर पाकिस्तानचे 35 ते 40 सैन्याचे अधिकारी आणि सैनिक मारले गेले, अशी माहिती भारताचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आत्तापर्यंत भारताने फक्त 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची माहिती अधिकृतपणे दिली होती. परंतु आज लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले गेल्याची बातमी दिली.Operation Sindoor

    लेफ्टनंट जनरल राजीव घई, डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए. के. भारती आणि डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशन्स व्हाइस ऍडमिरल ए. एन. प्रमोद यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात सविस्तर माहिती देणारी पत्रकार परिषद घेतली. भारतीय सैन्य दलांचे सुरुवातीचे सर्व हल्ले फक्त दहशतवादी केंद्रांवर होते पण पाकिस्तानने भारतीय सैन्य दलांवर आणि सामान्य नागरिकांवर हल्ले केल्यानंतर भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानी सैन्य दलांवर प्रतिहल्ले केले. त्यामध्ये पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले गेले, अशी माहिती राजीव घई यांनी दिली.



    Modi to j. D. Vance : पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    पाकिस्तानने इथून पुढे आगाऊपणा केला, भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक असेल, अशा स्पष्ट शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांना बजावले होते. ही माहिती आता उघड झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीवर न्यूयॉर्क टाइम्सने विपर्यास करणारे रिपोर्टिंग केल्यानंतर त्या रिपोर्टिंगला भारतीय सूत्रांनी प्रत्युत्तर दिले, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्यातल्या संभाषणाचा संदर्भ दिला.

    दहशतवाद्यांनी पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांची धर्म विचारून हत्या केली, त्यावेळी जे. डी. व्हान्स भारताच्या दौऱ्यावर होते. हल्ला झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला. त्यावेळी मोदींनी पाकिस्तानने आगाऊपणा केलाय. भारताचा प्रतिकार अधिक विध्वंसक असेल, असे व्हान्स यांना सुनावले होते, असे सूत्रांनी सांगितले.

    Indian Army killed 100+ terrorists, 35 to 40 Pakistani officers and soldiers in Operation Sindoor!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    IPL matches : 16 मेपासून IPL सुरू होण्याची शक्यता; उर्वरित 16 सामने तीन शहरांमध्ये होऊ शकतात

    Pakistan High Commission : पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी हेरांना अटक; दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात लष्कराची माहिती पाठवत होते, ऑनलाइन पेमेंट घेत होते

    Hamas support : पुण्यात हमास समर्थनाचे पोस्ट वाटणाऱ्या तरुणांना जमावाची मारहाण; परिसरात तणावाचे वातावरण; VIDEO व्हायरल