• Download App
    घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार मारले, पण मृतदेह घेऊन जाण्याचाही निरोप दिला|Indian Aarmy killed the Pakistani terrorist, but also said they would take away the body

    घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार मारले, पण मृतदेह घेऊन जाण्याचाही निरोप दिला

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला भारतीय लष्कराने ठार मारले. मात्र, मानवतेच्या भूमिकेतून पाकिस्तानला हॉटलाईनवर निरोप देऊन त्याचा मृतदेहही घेऊन जाण्याची परवानगी दिली.
    जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळून (एलओसी) भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाºया पाकिस्तानी दहशतवाद्याला भारतीय लष्कराने ठार केले.Indian Aarmy killed the Pakistani terrorist, but also said they would take away the body

    भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानवर दोन्ही लष्करांमध्ये सुरू असलेल्या युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानला हॉटलाइनवर संदेश पाठवत दहशतवादीला ठार केले, मृतदेह घेऊन जा, असे म्हटले.एक जानेवारी रोजी कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला.



    नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या सैन्याने केलेल्या तत्काळ कारवाईने हा प्रयत्न हाणून पाडला आणि दहशतवाद्याचा खात्मा केला. नंतर दहशतवाद्याची पाकिस्तानी नागरिक मोहम्मद शब्बीर मलिक म्हणून ओळख झाली, असे कुपवाडा येथे एका मीडिया ब्रीफिंगमध्ये जीओसी २८ विभागाचे मेजर जनरल अभिजित एस. पेंढारकर यांनी सांगितले.

    आम्ही हॉटलाइनवर पाकिस्तानी लष्कराशी संपर्क साधला. त्यांना मृत व्यक्तीचा मृतदेह परत घेण्यास सांगितले आहे. अधिकाºयाच्या म्हणण्यानुसार, बॅट (बॉर्डर अ‍ॅक्शन टीम) हे पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी यांचे मिश्रण असल्याचे म्हटले जाते. ते सीमेवर भारतीय सैन्यावर हल्ला करत असतात.

    पाकिस्तानी राष्ट्रीय ओळखपत्र आणि लसीकरण प्रमाणपत्रावरून मोहम्मद शब्बीर मलिकची ओळख पटली. तपासात शब्बीर नावाचा टॅब परिधान केलेल्या लष्कराच्या गणवेशातील घुसखोराचे छायाचित्र देखील होते. घुसखोर किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही नापाक कारवायांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने या ठिकाणावर पाळत ठेवली आहे, असेही पेंढारकर म्हणाले.

    पठाणी सूट आणि काळा जॅकेट घातलेला एक सशस्त्र घुसखोर शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागातून नियंत्रण रेषेपलीकडे फिरत असल्याचा दिसला. घुसखोर कोणत्या मागार्ने जाऊ शकतो त्यावर लक्ष ठेवले होते.

    दुपारी चार वाजेपर्यंत हालचाली सुरू होत्या. योग्य वेळी हल्ला करण्यात आला आणि दहशतवाद्याला ठार केले. त्याच्याजवळून एक एके-47 आणि सात ग्रेनेडसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला, असे पेंढारकर म्हणाले.

    Indian Aarmy killed the Pakistani terrorist, but also said they would take away the body

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार