• Download App
    मोठी बातमी : भारतात कोरोनाच्या बूस्टर डोसची तयारी, 10 दिवसांत सरकारी जाहीर करू शकते धोरण । India Will Soon Release Policy Document On Administering A Booster Dose Of Covid 19 Vaccine

    मोठी बातमी : भारतात कोरोनाच्या बूस्टर डोसची तयारी, 10 दिवसांत सरकारी जाहीर करू शकते धोरण

    देशातील कोरोना लसीच्या बूस्टर (तिसरा डोस) बाबतचे धोरण लवकरच जाहीर केले जाणार आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य डॉ. एनके अरोरा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला ही माहिती दिली आहे. येत्या 10 दिवसांत ही पॉलिसी येऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये त्या लोकांची श्रेणी दिली जाईल, ज्यांना तिसरा डोस देण्यास प्राधान्य दिले जाईल. India Will Soon Release Policy Document On Administering A Booster Dose Of Covid 19 Vaccine


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीच्या बूस्टर (तिसरा डोस) बाबतचे धोरण लवकरच जाहीर केले जाणार आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य डॉ. एनके अरोरा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला ही माहिती दिली आहे. येत्या 10 दिवसांत ही पॉलिसी येऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये त्या लोकांची श्रेणी दिली जाईल, ज्यांना तिसरा डोस देण्यास प्राधान्य दिले जाईल.

    अरोरा यांनी लोकांना त्यांच्या स्वत:च्या इच्छेनुसार बूस्टर डोस न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, कारण कोविनवर रेकॉर्ड केले जाणार नाही आणि कोणतेही प्रमाणपत्र दिले जाणार नाही. अनेक लोक गुपचूप तिसरा डोस घेत असल्याच्या बातम्या येत असल्याने अरोरा यांनी हा सल्ला दिला आहे. अरोरा म्हणाले की, देशभरातील सेरोपॉझिटिव्ह अभ्यासानुसार, लसीकरण आतापर्यंत प्रभावी ठरले आहे आणि असे कोणतेही कारण समोर आले नाही की, लोकांनी लसीकरणासाठी गुपचूप लस घ्यावी.



    देशात लसीची कमतरता नाही

    अरोरा यांच्या मते, 85% लोकांना किमान पहिला डोस मिळाला आहे. सेरोपॉझिटिव्ह अभ्यासानुसार, लसीकरणाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. दिल्लीतील 97% लोकसंख्या सेरोपॉझिटिव्ह आहे. UP मध्ये 88%, तेलंगणात 85% लोकसंख्या सेरोपॉझिटिव्ह आहे. अरोरा म्हणतात की, देशात लसीची कमतरता नाही. दर महिन्याला 30-35 कोटी डोस तयार केले जात आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला विनाकारण डोस मिळतात.

    अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोनाचे रुग्णही कमी होत आहेत, त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. आम्ही इतर अनेक देशांपेक्षा चांगल्या स्थितीत आहोत. अरोरा यांचे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा तेलंगणाच्या आरोग्य अधिकार्‍यांसह अनेक अधिकार्‍यांनी उघडपणे तिसर्‍या डोसची वकिली केली आहे. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी तिसरा डोस घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

    दुसऱ्या डोसच्या 6 महिन्यांनंतर बूस्टर डोस घेणे चांगले

    कोवॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेक कंपनीचे एमडी डॉ. कृष्णा एला यांनी म्हटले आहे की, दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिन्यांनी बूस्टर डोस घेणे योग्य ठरेल. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय सरकारने घ्यायचा आहे. दरम्यान, अमेरिकेसह अनेक देशांनी कोरोना लसीचा बूस्टर (तिसरा डोस) देण्यास सुरुवात केली आहे, परंतु भारतात ती अद्याप सुरू झालेली नाही.

    India Will Soon Release Policy Document On Administering A Booster Dose Of Covid 19 Vaccine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य