• Download App
    हवाई वाहतुकीत भारत दशकभरात अव्वलस्थानी, २२० विमानतळे बांधण्याचे उदिष्ट|India will on top in aviation sector l

    हवाई वाहतुकीत भारत दशकभरात अव्वलस्थानी, २२० विमानतळे बांधण्याचे उदिष्ट

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता – पुढील दशकभरात भारत हवाई वाहतूक क्षेत्रात अव्वलस्थानी असेल, असा विश्वास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला. हवाई वाहतूक क्षेत्राला एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील संपर्क वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.India will on top in aviation sector l

    विमानतळांची संख्या आताच्या १३६ वरून वाढवून २२० करण्याचे उद्दिष्ट भारत सरकारचे आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.शिंदे म्हणाले, ‘‘मागील ७० वर्षांत ७४ विमानतळ निर्माण झाले, पण मागच्या केवळ सात वर्षांत आपण ६२ नवीन विमानतळ बांधले. आता आपल्याकडे १३६ विमानतळ आहेत,



    पण आपण इथेच थांबणार नाही. २०२५ पर्यंत देशात २२० विमानतळ बांधण्याचा आपला निर्धार आहे. त्यात हेलिपोर्ट आणि वॉटरपोर्टदेखील असतील. उद्या नोएडाजवळ आपण जेवर विमानतळाचे उद्घालटन करत आहोत.’’

    मेट्रो सिटीजमध्ये दोन विमानतळांची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले. एका विमानतळावर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे सर्वच मेट्रो शहरांत दोन विमानतळ असले पाहिजेत. दिल्ली आणि मुंबईत आणखी एक विमानतळ बांधण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. त्याचप्रमाणे कोलकात्यातही ही प्रक्रिया सुरू करू, असे शिंदे यांनी सांगितले.

    India will on top in aviation sector l

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते