• Download App
    देशात आता कोरोना प्रतिबंधासाठी पाचवी लसही उपलब्ध, लसीकरणाचा वेग वाढणार|India will now get fifth vaccine

    देशात आता कोरोना प्रतिबंधासाठी पाचवी लसही उपलब्ध, लसीकरणाचा वेग वाढणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – देशात आता एकच डोस असलेली कोरोना लस उपलब्ध होणार आहे. कारण केंद्र सरकारने जॉन्सन अॅंड जॉन्सन या अमेरिकी कंपनीच्या कोरोना लशीचा आपत्कालीन परिस्थितीत भारतात वापर करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.India will now get fifth vaccine

    जॉन्सन कंपनीच्या लशीला केंद्राने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली आहे. मंडाविया यांनी म्हटले की भारतात लसीकरणाचा परीघ विस्तारला आहे. यानुसार जॉन्सनची लसही उपलब्ध होणार असून ५ लसी उपलब्ध झाल्यामुळे भारताच्या कोरोनाविरुद्धच्या सामूहिक लढाईला आणखी प्रोत्साहन व बळ मिळेल.



    वर्षाअखेर सर्व देशवासीयांचे कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्याची घोषणा केंद्राने केली असली तरी सध्याच्या वेगाने हे लक्ष्य पूर्ण होणे कठीण दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जॉन्सन कंपनीची व तीही सिंगल डोस लस उपलब्ध झाल्यास लसीकरणाला मोठा हातभार लागू शकतो.

    सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशी केंद्र सरकार स्वतः खरेदी करून राज्यांना मोफत देत आहे. याशिवाय स्पुटनिक, मॉडर्ना लसीही देशात उपलब्ध असल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात आले आहे. या दोन लशीच्याही आपत्कालीन वापरासाठी केंद्राने मंजुरी दिली आहे.

    India will now get fifth vaccine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे