• Download App
    Pahalgam attack सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??

    Pahalgam attack

    Pahalgam attack पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातले मोदी सरकार पाकिस्तान वर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक किंवा अन्य कुठला स्ट्राईक कधी करणार याकडे डोळे लावून बसलेल्या सोशल मीडिया वीरांना भारत – पाकिस्तान युद्धाची एवढी “तहान” लागली आहे की ते वेगवेगळ्या मार्गांनी मोदी सरकारला पाकिस्तान वरच्या हल्ल्याच्या सामरिक, ज्योतिषशास्त्रीय, राजनैतिक असा वेगवेगळ्या प्रकारचा “मुहूर्त” सांगून राहिलेत. युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम यांच्यासारख्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेगवेगळ्या सुरक्षा सल्लागारांचा सल्ल्यांचा भरमार सुरू आहे. हे सगळे “आंतरराष्ट्रीय दर्जाचे सोशल मीडिया तज्ज्ञ” एवढे जबरदस्त “संरक्षण तज्ज्ञ” झाले आहेत, की आता त्यांनी दिलेला सल्ला पंतप्रधान मोदींनी मानायचा आणि पाकिस्तानचा “क्षणार्धात” खात्मा करून टाकायचा एवढेच काम आता मोदींना उरले आहे!! … आणि पाकिस्तानचा “क्षणार्धात” खात्मा झाला की आपल्या “बिनचूक आणि अचूक” सल्ल्यामुळेच मोदींनी पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई केली, अशा पोस्टी टाकायला आणि युट्युब वर व्हिडिओ बनवायला हे स्वयंघोषित “सुरक्षा सल्लागार” मोकळे होणार आहेत!!Pahalgam attack

    पण देशाच्या सुदैवाने नरेंद्र मोदी हे असल्या “बिनचूक आणि अचूक” सल्लागारांच्या आहारी न जाणारे पंतप्रधान असल्याने त्यांनी अजून उघडपणे पाकिस्तान वर कुठला सर्जिकल अथवा एअर स्ट्राईक केलेला नाही किंवा तो त्यांनी उघडपणे बोलूनही दाखवलेला नाही.



    वास्तविक साध्या शिकारीपासून ते अगदी अंतराळ युद्धापर्यंत एक साधा नियम आहे, तो म्हणजे सावज दमले की शिकार करायची असते. त्या आधी सावजाच्या मागे धावून आपण स्वतःच दमायचे नसते. सावज सावध असताना बिलकुल बार टाकायचा नसतो. सावज बेसावध असताना बार कुठून आला आहे समजायच्या आत त्याच्यावर बार टाकून शिकार साधायची असते. त्यासाठी कुठली हलगी, टिमकी, तुणतुणे किंवा ढोल असली वाद्ये वाजवायची नसतात.

    पंतप्रधान मोदींनी नेमकेपणाने हाच नियम पाळून भारतीय सैन्य दलांना पाकिस्तानला धडा शिकवायची वेळ, ठिकाण आणि मोडस ऑपरेंडी ठरवायची मुभा देऊन ते मोकळे झाले त्यांनी देशभर कार्यक्रम करायला सुरुवात केले आणि त्याच दरम्यान टप्प्याटप्प्याने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या. सिंधू जल करार स्थगित करण्यापाठोपाठ व्यापार थांबवला आणि आता छुपी आणि उघड आयात एका झटक्यात थांबवून टाकली. भारत पाकिस्तान मधली टपाल सेवा पार्सल सेवा बंद करून टाकली.

    मानवतेच्या नावाखाली झालेल्या खवातीनांच्या आरडाओरड्याला जास्त किंमत दिली नाही. शक्य होईल तिथे सवलत दिली आणि जिथे शक्य होणार नाही तिथे अजिबात सवलत दिली नाही. पण याच दरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये शोध मोहिमा राबवून पाकिस्तानी आणि बांगलादेशी हुडकून काढले. हे सगळे सुरू असताना स्वतः मोदी देशभरातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सामील झाले. त्यांनी क्वचितच पाकिस्तानचा उल्लेख करून त्याला जुनाच इशारा दिला.

    याच दरम्यान पाकिस्तान मधल्या डझनभर मंत्र्यांनी जशी टपोरीगिरी करून फालतू बडबड केली, तशी भारतातल्या एकाही मंत्र्याने केली नाही. विरोधकांपैकी हाताच्या बोटावरच मोजण्याएवढे लोक “संजय राऊत” किंवा “राहुल गांधी” झाले. पॉलिटिकली मॅच्युअर्ड विरोधक शांत राहिले.

    याच कालावधीत अमेरिका, युरोप, चीन या शक्तींनी भारत आणि पाकिस्तानला नेहमीचा उपदेश केला. पण मोदी सरकारने त्या उपदेशाकडे लक्ष दिले नाही. पण पाकिस्तानने मात्र आधी इराण आणि नंतर सौदी अरेबिया यांना मध्यस्थी करायची गळ घातली. भारताने त्याकडेही दुर्लक्ष केले.

    – पाकिस्तानने “निवडलेल्या” वेळेत हल्ला नाही

    या सगळ्याचे वर्णन तिलक देवाशेर त्या संरक्षण तज्ज्ञांनी अचूक केले. मोदी सरकारने आपली स्ट्रॅटेजी पूर्ण बदलली आहे. भारत नेमकी कोणती प्रतिबंधात्मक कारवाई करणार याचा विचार करायला लावून पाकिस्तानच्या राजनैतिक वर्तुळाला भंडावून सोडले आहे. कारण पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लगेचच एअर स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईक करेल, असे पाकिस्तानने गृहीत धरले होते. म्हणूनच पाकिस्तान्यांनी दहशतवाद्यांची लाँच पॅड्स रिकामी करून पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधले मदरसे बंद करून टाकले. पाकिस्तानच्या फौजा वेगवेगळ्या ठिकाणी लामबंद करून ठेवल्या. पाकिस्तानचे बडे मंत्री भारताला धमकावत राहिले. पण पाकिस्तानला हवे तसे भारत वागलाच नाही. मोदी सरकारने पाकिस्तानने निवडलेल्या वेळेनुसार त्याच्यावर अद्याप हल्लाच केला नाही. याचा नेमका अर्थ असा की पाकिस्तानला आणि त्याच्या इकोसिस्टीमला कायम दबावाखाली आणि विचारात ठेवून भंडावून सोडायचा भारताचा इरादा दिसतोय. त्याचवेळी पाकिस्तानच्या सर्व लष्करी थिंग टॅंकने विचारही केलेला नसेल अशा ठिकाणाहून सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक पेक्षा वेगळाच स्ट्राईक भारत करू शकेल. ज्यावेळी सावज दमलेले असेल, त्यावेळी शिकार साधली जाईल. ती कुणाला सांगून किंवा कुणाच्या अनाहूत सल्ल्याने होणार नाही.

    India will not attack at the time of Pakistan’s choice

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ram temple : राम मंदिरातून महाराष्ट्रातील मुस्लिम महिलेला ताब्यात घेतले; संशयास्पद हालचालींमुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखले

    Godhra tragedy : पोलिसांचा निष्काळजीपणा नसता तर गोध्राकांड झाले नसते; 9 रेल्वे पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय कायम

    Rajasthan : राजस्थानात BSFने पाकिस्तान रेंजरला ताब्यात घेतले; भारताने पाकिस्तानकडून आयात आणि टपाल सेवा थांबवल्या