विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने अमेरिकेतील कंपन्यांकडून रेमडेसीव्हीरच्या चार लाख ५० हजार कुप्या मागविल्या आल्या आहेत. पुढील एक ते दोन दिवसांत ७५ हजार ते एक लाख, तर १५ मेपर्यंत किंवा त्याआधी आणखी एक लाख कुप्या मिळतील.India will import Remidisivir from USA
कोरोना उपचारासाठी गरजेच्या मानल्या गेलेल्या रेमडेसीव्हीर औषधाची देशातील कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने अन्य देशांकडून ते आयात करायला सुरवात केली आहे.
एकूण साडेचार लाख कुप्या मागविण्यात आल्या असून, त्यापैकी ७५ हजार कुप्या शुक्रवारी पोहोचणार आहेत. सरकारने देशातील उत्पादन क्षमताही वाढविली आहे.
देशांतर्गत सात परवानाधारक उत्पादकांची उत्पादन क्षमता दरमहा ३८ लाखांवरून १ कोटी ३ लाख कुप्या इतकी वाढली आहे. गेल्या सात दिवसांत कंपन्यांनी देशभरात एकूण १३.७३ लाख कुप्यांचा पुरवठा केला आहे.
सर्वसामान्य जनतेला हे इंजेक्शन परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्यासाठी सुधारित किरकोळ किंमत जाहीर करत सर्व प्रमुख ब्रँडची किंमत प्रति कुपी साडेतीन हजार रुपयांपेक्षा कमी केली. तसेच रेमडेसिव्हीरचे जास्त उत्पादन आणि उपलब्धता सुलभ करण्यासाठी सीमाशुल्क माफ करण्यात आले आहे.
India will import Remidisivir from USA
महत्त्वाच्या बातम्या
- बिल गेटस यांच्यावर भारतविरोधी वक्तव्यावर टीकेचा भडिमार
- कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी लष्कराला विशेष आर्थिक अधिकार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा
- ‘जमातियों के खिलाफ भौंक रहा था,अल्लाह ने जहन्नुम में सड़ने भेजा’ : रोहित सरदाना यांच्या निधनावर काही पत्रकार आणि कट्टरपंथियांचा जल्लोष
- भारतच नव्हे, तर अख्ख्या जगात हॉस्पिटल बेडची टंचाई; सर्वात टॉपच्या जपानमध्येही हजार लोकांवर फक्त १३ बेड, वाचा सविस्तर..