• Download App
    जगभरातील तब्बल ५० हून जास्त देशांना भारत देणार कोविन ॲप। India will give covin app for 50 countries

    जगभरातील तब्बल ५० हून जास्त देशांना भारत देणार कोविन ॲप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनावरील कोविन मोबाईल अॅपचे तंत्रज्ञान जगाला देण्यास भारत तयार आहे, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. भारतातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोविन जागतिक परिषदेत ते बोलत होते. India will give covin app for 50 countries

    कोविन या अॅपची सोर्स आवृत्ती बनवावी व जे देश कोवीनसाठी मागणी करतील त्यांना ते निःशुल्क उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी केंद्रातील वरिष्ठ अधिकारयांना दिले आहेत. कॅनडा, मेक्सिको व आफ्रिकी देशांसह जगातील किमान ५० देशांनी कोविन अॅपबाबत उत्सुकता दाखविली आहे.



    यावेळी मोदी म्हणाले की, भारत जागतिक साथीच्या सुरवातीपासूनच आपले तंत्रज्ञान जगाला देण्यास तयार आहे. भारताने ट्रेसिंग-ट्रॅकिंगपासून कोविन चा वापर सुरू केला. २० लाख लोकांसह हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले. डिजिटल जनसेवा म्हणून भारताने कोविन तंत्रज्ञान दुसऱ्या देशांना देण्याची तयारी दाखविली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण ही मोठी आशा आहे.

    India will give covin app for 50 countries

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!