• Download App
    तालिबान्यांच्या भारताविरोधातील संभाव्य कारवाया मोडून काढू - सरसेनाध्यक्ष रावत यांचा इशारा |India will fight against terrorism

    तालिबान्यांच्या भारताविरोधातील संभाव्य कारवाया मोडून काढू – सरसेनाध्यक्ष रावत यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – तालिबान्यांच्या ताब्यातील अफगाणिस्तानातून भारताविरोधातील कोणत्याही संभाव्य दहशतवादी कारवायांच्या धोक्याला सडेतोड उत्तर देण्यात येईल, असा इशारा सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांनी दिला आहे.India will fight against terrorism

    रावत म्हणाले, की ‘‘ अफगाणिस्तानातील सत्ता ही तालिबान्यांच्या ताब्यात जाईल याचा अंदाज आम्हाला आला होता पण ताज्या घडामोडी या आश्चगर्यचकित करणाऱ्या आहेत. मागील वीस वर्षांमध्ये या संघटनेत थोडाही बदल झालेला नाही.’’



    अफगाणिस्तानातून परतणारी मंडळी तिथे तालिबान्यांकडून होणाऱ्या त्यांच्या छळाबाबत आम्हाला सांगत आहेत. मागील वीस वर्षांमध्ये त्यांच्या वर्तणुकीत काडीचाही फरक पडलेला नाही. आता त्यांचे फक्त भागीदार बदलले आहेत, असे रावत म्हणाले.

    भारत दहशतवादमुक्त वातावरणासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद करत रावत म्हणाले, की ‘‘ दहशतवाद्यांच्या संभाव्य कारवायांचा वेध घेण्यासाठी ‘क्वाड’च्या सदस्य देशांनी त्याबाबत गुप्त सूचना दिल्या तर आम्ही त्याचे स्वागतच करू.’’ क्वाड संघटनेमध्ये भारतासह अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.

    India will fight against terrorism

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली