विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – चीनकडून द्वीपक्षीय करारांचे झालेले उल्लंघन आणि पूर्वस्थितीमध्ये बदलाचा एकतर्फी प्रयत्न यामुळेच ताबारेषेवरील तणावाची स्थिती उद्भवली आहे. यासोबतच, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग असल्याचेही ठणकावून सांगण्यात आले. India warns China on border
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, की अन्य क्षेत्रातील शांततेसाठी भारताने दिलेल्या रचनात्मक प्रस्तावांना चीनने सहमती दर्शविली नाही आणि नवे प्रस्तावही दिले नाहीत. अर्थात दोन्ही पक्ष संवाद सुरू ठेवणे आणि सीमेवर शांतता स्थैर्य राखण्यावर सहमत आहेत ही सकारात्मक बाब आहे.
अपेक्षा आहे की चीनी पक्ष द्विपक्षीय करार, नियमांचे पालन करून पूर्व लडाखमध्ये ताबारेषेसह सर्व शिल्लक मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल.उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या चीनला बागची यांनी पुन्हा एकदा फटकारले.
भारतीय नेते इतर राज्यांप्रमाणेच अरुणाचलमध्येही जातात. भारतीय नेत्यांना आपल्याच देशातील एका राज्यात जाण्यावर घेतला जाणारा आक्षेप भारतीय जनतेच्या आकलनापलीकडचा आहे. आपल्याच एका राज्यात उपराष्ट्रपती जातात आणि कोणी तरी त्याला विरोध करतो, हे आपल्यासाठी गंभीर आहे. म्हणून चीनी आक्षेप नाकारल्याचे बागची यांनी सुनावले.
India warns China on border
महत्त्वाच्या बातम्या
- फेसबुकची ‘सीक्रेट ब्लॅकलिस्ट’ लीक, भारतातील ‘या’ 10 धोकादायक संस्था आणि लोकांची नावेही समाविष्ट
- Cruise Drugs Case : आर्यन खान 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामिनावरील निकाल राखून ठेवला
- बांग्लादेशात दुर्गापूजा मंडपात कट्टरतावाद्यांकडून तोडफोड, देवीच्या मूर्तीची विटंबना, अफवांमुळे उसळला हिंसाचार
- नवाब मलिक म्हणाले, हे लोक तंबाखू आणि गांजामध्ये फरक करू शकत नाहीत, NCB ने जावयाच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालय गाठले