विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत गाव माहित आहे. पेट्रो डॉलर असलेली सौदी अरेबियाही हे नाही किंवा सिलीकॉन व्हॅली असलेल्या कॅलिफोनिर्यातही. हे गाव आहे भारतात. गुजरातमधील हे गाव जगातील सर्वात श्रीमंत गाव आहे.India, the richest village in the world, has over Rs 5,000 crore in bank deposits, with an average of over Rs 15 lakh per person
गुजरातमधील कच्छ भागातील माधापार हे गाव सर्वात श्रीमंत आहे. या गावात १७ बॅँका आहेत. गावात ७,६०० घरे आहेत. पण सर्वात महत्वाचे म्हणजे येथील गावकऱ्यांच्या बॅँकेमध्ये पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत. याचा अर्थ सरासरी प्रत्येक गावकऱ्यांचे पंधरा लाख रुपये बॅँकेत आहेत. या गावात शाळा, महाविद्यालये, तलाव, लॉन्स, धरण, आरोग्य केंद्रे आणि मंदिरेही आहेत. गावात एक अत्याधुनिक गोशाळा देखील आहे
गावच्या श्रीमंतीचे कारण म्हणजे येथील बहुतेक कुटुंबातील सदस्य आणि गावातील नातेवाईक युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, आफ्रिका आणि आखाती देशांसारख्या परदेशी देशांमध्ये राहतात. मुख्यत: पटेल समाजातील ६५ टक्केंपेक्षा जास्त लोक अनिवासी भारतीय आहेत. ते परदेशातून कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात पैसे पाठवतात. यापैकी बरेच अनिवासी भारतीय तारुण्यात नशीब काढण्यासाठी परदेशात गेले. तेथे चांगली कमाई केली आणि आयुष्याच्या उत्तरार्धात माधपरमध्ये येऊन स्थायिक झाले आहेत.
माधापार व्हिलेज असोसिएशन नावाची एक संस्था लंडनमध्ये स्थापन करण्यात आली होती. परदेशात राहणाऱ्या माधापारच्या लोकांना भेटणे सुलभ व्हावे हा त्यामागचा उद्देश होता. या संस्थेचे एक कार्यालय आता माधापारमध्येही उघडले जाणार आहे.
या गावातील लोकांचे वैश्ष्टिय म्हणजे येथील अनेक गावकरी परदेशात स्थायिक झाले असले तरी त्यांची नाळ गावाशीच जोडली आहे. त्यामुळे आपली बचत दुसऱ्या देशातील बॅँकेत ठेवण्यापेक्षा गावातील बॅँकेमध्ये ठेवणे पसंद करतात. शेती हा या गावचा मुख्य व्यवसाय असून येथील उत्पादन मुंबईला पाठविले जाते.
India, the richest village in the world, has over Rs 5,000 crore in bank deposits, with an average of over Rs 15 lakh per person
महत्त्वाच्या बातम्या
- वीर सावरकरांबद्दल अपुऱ्या माहितीवरून ट्विट करणे ही माझी चूक; भाजप आमदार नितेश राणेंची कबुली
- पाकिस्ताननंतर बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे कट्टरवाद्यांकडून नुकसान
- Corona Vaccine Clinical Trial Data : लसीच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस
- सरकारने रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून एमएसपीवर आतापर्यंतची सर्वात मोठी खरेदी केली : पंतप्रधान मोदी