भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यात मोठ्या संरक्षण करारावर शिक्कामोर्तब झाले. भारत सरकारने शनिवारी (15 जुलै) ही घोषणा केली. या अंतर्गत भारतीय नौदलाला फ्रान्सच्या दसॉ एव्हिएशनकडून 26 नवीन प्रगत राफेल लढाऊ विमाने मिळतील, जी नौदलाच्या गरजेनुसार खास तयार केली जातील. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला. India Seals Purchase of 26 Rafale Jets China and Pakistan tension increased There will be a significant increase in the strength of the Indian Navy
राफेलची निर्माता कंपनी दसॉ एव्हिएशनने याबाबत माहिती दिली की, “भारतीय नौदलाला नवीनतम पिढीतील लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी भारत सरकारने नौदलाच्या राफेलची निवडीची घोषणा केली. भारतीय नौदलाचे 26 राफेल आधीच सेवेत असलेल्या 36 राफेलमध्ये सामील होतील.” संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी (13 जुलै) फ्रान्सकडून नौदलासाठी २६ राफेल जेट आणि तीन फ्रेंच-डिझाइन स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. हा निर्णय भारतात घेण्यात आलेल्या यशस्वी चाचणी मोहिमेनंतर आला आहे, ज्यामध्ये नौदलाच्या राफेलने हे सिद्ध केले आहे की ते भारतीय नौदलाच्या ऑपरेशनल आवश्यकता पूर्ण करते आणि त्यासाठी पूर्णपणे योग्य आहे.
या संरक्षण करारात भारताला 22 सिंगल सीटर राफेल-एम मरीन लढाऊ विमाने मिळणार आहेत. ही लढाऊ विमाने स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेवर तैनात केली जातील. त्याचबरोबर 4 ट्रेनर राफेल मरीन विमाने उपलब्ध होणार आहेत. राफेल-एम ही फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांची नौदल आवृत्ती आहे. संरक्षण करारानंतर भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार आहे.
India Seals Purchase of 26 Rafale Jets China and Pakistan tension increased There will be a significant increase in the strength of the Indian Navy
महत्वाच्या बातम्या
- अर्थमंत्री अजितदादांना मंत्रालयात सहाव्या नव्हे, पाचव्या मजल्यावरचे 503 क्रमांकाचे दालन!!
- हिमाचलमध्ये पाऊस आणि पुराचा कहर; मुख्यमंत्री सुखू म्हणाले आतापर्यंत ६० हजार जणांना वाचवलं!
- तडजोड : अर्थ आणि सहकार ही दोनच मलईदार खाती राष्ट्रवादीकडे; अजितदादा अर्थमंत्री, पण जलसंपदा खाते फडणवीसांकडे, तर महसूल खाते विखेंकडेच!!;
- मिशन चंद्रयान 3 यशस्वी!!; पंतप्रधान मोदींनी फ्रान्स मधून केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन!!