• Download App
    Pakistan पाकिस्तानसोबतच्या तणावात भारताला मोठा यश

    Pakistan : पाकिस्तानसोबतच्या तणावात भारताला मोठा यश; दोन दहशतवाद्यांनी केलं आत्मसमर्पण, दारूगोळा जप्त

    Pakistan

    दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बास्कुचन भागात सुरू होती शोधमोहम


    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : Pakistan पाकिस्तान आपल्या नापाक कारवायांपासून थांबलेला नाही. नेहमीच सीमेपलीकडून भारताविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र यावेळी त्यांचा एक कट अयशस्वी झाला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला भाग पाडले आहे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.Pakistan

    जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरुवारी सांगितले, की दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बास्कुचन भागात सुरू केलेल्या घेराबंदी आणि शोध मोहिमेदरम्यान (CASO) लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विशेष माहितीनंतर, शोपियानच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) ने भारतीय लष्कराच्या 44 RR आणि CRPF च्या 178 बटालियनच्या समन्वयाने संयुक्तपणे ही कारवाई केली.



     

    अधिकाऱ्यांनी सांगितल की, त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये दोन AK-56 रायफल, चार मॅगझिन, 7.62×39 मिमीच्या 102 राउंड, दोन हँडग्रेनेड, दोन पाउच, 5400 रुपये रोख, एक मोबाईल फोन, एक स्मार्टवॉच, दोन बिस्किट पॅकेट आणि एक आधार कार्ड यांचा समावेश आहे.

    अलीकडेच पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतरही दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला, जो लष्कराने हाणून पाडला. सुरक्षा दलांनी आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांना ठार मारले आहे.

    India scores big win in tension with Pakistan Two terrorists surrender, ammunition seized

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bengaluru : बंगळुरूत जोडप्याने फूड डिलिव्हरी एजंटला चिरडले; स्कूटर कारला खेटून गेल्याने 2 किमी पाठलाग करून धडक

    Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी म्हणाली- दाऊद दहशतवादी नाही, मुंबई बॉम्बस्फोट त्याने घडवून आणले नाहीत, मी त्याला कधीच भेटले नाही

    Gujarat : गुजरातेत गर्भपातावर सुनावणी सुरू असताना अल्पवयीन पीडिता प्रसूत; 15 वर्षीय रेप पीडितेचा खटला; राज्याला 6 महिन्यांचा खर्च उचलण्याचे आदेश