• Download App
    भारत-सौदी अरेबिया सहयोग परिषद; चार लाख कोटींच्या बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामास वेग येणारIndia-Saudi Arabia Cooperation Council; The work of the four lakh crore Barsu oil refinery project will be speeded up

    भारत-सौदी अरेबिया सहयोग परिषद; चार लाख कोटींच्या बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामास वेग येणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढणाऱ्या कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामास वेग येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहंमद बिन सलमान यांच्यात सोमवारी यासंदर्भात सहमती झाली. सुमारे 4 लाख कोटींच्या या प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाली आहे आहे, असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले.India-Saudi Arabia Cooperation Council; The work of the four lakh crore Barsu oil refinery project will be speeded up

    हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे. बैठकीत हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली. आगामी वर्षात सौदीर अरेबिया भारतात ८.२० लाख कोटींची गंुतवणूक करणार आहे. एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या राजकुमार सलमान यांचे राष्ट्रपती भवनात आैपचारिक स्वागत करण्यात आले.



    या क्षेत्रातही सहकार्य

    शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य, दळणवळण, पर्यटन, ऊर्जा, वायू, ऑप्टिकल ग्रीड व फायबर केबल नेटवर्क.

    गुजरातच्या सौदी अरेबिया गुजरातच्या गांधीनगर मधील आर्थिक झोन ‘गिफ्ट सिटी’मध्ये साॅव्हरेन वेल्थ फंडचे कार्यालय सुरु करण्याची शक्यत आहे. यामुळे व्दिपक्षीय गुंतवणूकीला गती मिळेल ,अशी अपेक्षा सौदीच्या गंुतवणूक मंत्र्यांनी सांगितले. भारतही फिक्कीच्या साह्याने सौदीची राजधानी रियाधमध्ये गंुतवणूक करणार आहे.

    बारसू प्रकल्पावरून राजकीय वाद

    अरमाको कंपनीचा हा प्रकल्पपूर्वी नाणार येथे प्रस्तावित होता. तिथे विरोध झाल्यानंतर हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे हलवण्यात आला. त्यासाठी १३ हजार एकर भूसंपादनही झाले आहे.परंतु या प्रकल्पासही विरोध सुरू झाला आहे. आता या प्रकल्पावरून कोकणातील राजकारण पुन्हा तापणार आहे.

    India-Saudi Arabia Cooperation Council; The work of the four lakh crore Barsu oil refinery project will be speeded up

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र