नाशिक : ऑपरेशन सिंदूर मधून भारतीय हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यात पाकिस्तानातल्या नूर खान एअर बेस आणि किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का बसला. त्यामुळे पाकिस्तानात रेडिएशनचा धोका निर्माण झाला आणि अमेरिकेसकट चीनलाही भारताच्या अचूक मारक क्षमतेचा हादरा बसला. म्हणूनच अमेरिकन नेतृत्व भारत आणि पाकिस्तान मधल्या युद्धविरामासाठी धडपडले, अशी खरी स्टोरी आता बाहेर आली आहे.
बाकी न्यूयॉर्क टाइम्स आणि CNN यांनी भारत विरोधी narrative चालू ठेवण्यासाठी भारत आणि पाकिस्तान मधल्या अणुबॉम्ब युद्धाचा बागुलबुवा उभा केला. प्रत्यक्षात भारत विरुद्ध अनुभव युद्ध करण्याची पाकिस्तानची क्षमता भारताने उद्ध्वस्त केल्याचे सत्य या अमेरिकन माध्यमांनी दडवून ठेवले होते.
आधुनिक तंत्रज्ञानात भारत सुपर पॉवर
पण ऑपरेशन सिंदूर मधल्या चार दिवसांच्या कारवाईत भारताची तांत्रिकदृष्ट्या अचूक मारक क्षमता सगळ्या जगाच्या लक्षात आली. भारताने ठरविले, तर भारत pinpointed precision and professional attacks कुठेही करू शकतो. त्यात शत्रुराष्ट्रांचे कुठलेही तांत्रिक अडथळे भारत शिल्लकच ठेवत नाही, हे भारतीय हवाई दलाने आपल्या शस्त्रांसह पाकिस्तानात 100 किलोमीटर पर्यंत आत मध्ये घुसून सगळ्या जगाला दाखवून दिले. ब्राह्मोस, सुदर्शन चक्र यांची अचूक मारक क्षमता आणि अचूक बचाव क्षमता सगळ्या जगाला मान्य करावी लागली. भारत अत्याधुनिक तंत्रज्ञान युद्ध क्षेत्रात super power झाल्याचे जगाला मान्य करावे लागले.
पण त्या पलीकडे जाऊन भारतीय हवाई दलाने ज्यावेळी इस्लामाबाद आणि रावळपिंडी जवळच्या चकला अर्थात नूर खान एअर बेसवर अचूक हल्ला करून संहार केला आणि किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्र कमांडला धक्का लावला, त्यावेळी अमेरिका आणि चीन खडबडून जागे झाले. कारण पाकिस्ताने तिथे वेगवेगळ्या क्षमतेच्या अण्वस्त्रांबरोबरच चिनी बनावटीची अनेक मिसाईल्स ठेवली आहेत. भारतीय हवाई दलाने तिथपर्यंत पोहोचण्याची क्षमता दाखवली.
त्यामुळे 48 तासांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी करावी यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धडपडाट केला. मात्र त्याच वेळी आता पाकिस्तानात रेडिएशनचा धोका निर्माण झाला. त्यामुळे अमेरिकेच्या विमानांनी इस्लामाबाद रावळपिंडी परिसरात घिरट्या घालून ते रेडिएशन चेक केले. इजिप्शियन विमानातून रेडिएशन विरोधी मटेरियल आणले गेले. सध्या पाकिस्तानातल्या राज्यकर्त्यांमध्ये रेडिएशनची भीती निर्माण झाली असून त्याचा मुकाबला कसा करावा, यावर खल सुरू आहे.
India reached Pakistan’s nuclear arsenals, radiation fear engulfs Pakistan
महत्वाच्या बातम्या
- भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा
- ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी
- कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!