• Download App
    भारताने दरवर्षी किमान १०० अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक आकर्षित करायला हवी – अघी यांचा सल्ला। India must attract 100 billion foreign investment every year

    भारताने दरवर्षी किमान १०० अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक आकर्षित करायला हवी – अघी यांचा सल्ला

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : भारताला पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनायचे असल्यास दरवर्षी किमान १०० अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक आकर्षित करायला हवी, असे मत ‘अमेरिका-भारत धोरणात्मक आणि भागीदारी मंचा’चे अध्यक्ष मुकेश अघी यांनी व्यक्त केले. India must attract 100 billion foreign investment every year

    एका मुलाखतीदरम्यान मुकेश अघी म्हणाले,‘‘ भारताची सध्याची अर्थव्यवस्था २.७ हजार अब्ज डॉलरची आहे. येथून पाच हजार अब्ज डॉलरपर्यंत मजल मारायची आहे. ही झेप मारण्यासाठी दरवर्षी १०० अब्ज डॉलरची परकी गुंतवणूक आकर्षित करावी लागेल. ही गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी काय करता येईल, याचा भारताने विचार करावा.’’



    भारत आणि अमेरिकेतील भागीदारी येत्या काही काळात वृद्धींगत होण्याची दाट शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. अमेरिकेत सध्या ४५ लाख भारतीय आहेत. ते विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. या गोष्टीचा सकारात्मक परिणाम होऊन दोन देशांमधील संबंध आणखी दृढ होऊ शकतात, असेही मुकेश अघी म्हणाले.

    India must attract 100 billion foreign investment every year

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    LPG Crisis : राज्यांना 10% अतिरिक्त एलपीजी कोटा मिळेल; सरकारने मान्य केले- एलपीजीची टंचाई सुरूच

    BHAVYA Scheme : भव्य योजनेला केंद्राची मंजुरी, 100 औद्योगिक उद्याने उभारली जातील; ₹33,660 कोटी खर्च

    DGCA : देशांतर्गत विमानांत 60% जागा मोफत निवडता येतील; आधी सुमारे ₹3000 पर्यंत लागत होते