• Download App
    भारताने अफगाणिस्तानला वीज, धरणे, शाळा दिल्या, पाकिस्तानने त्याला काय दिले हे सगळ्या जगाला माहिती आहे; भारतीय परराष्ट्र प्रवक्त्यांचा टोला india has brought electricity, dams, schools, healthcare, and community projects to Afghanistan. And the world knows what Pakistan

    भारताने अफगाणिस्तानला वीज, धरणे, शाळा दिल्या, पाकिस्तानने त्याला काय दिले हे सगळ्या जगाला माहिती आहे; भारतीय परराष्ट्र प्रवक्त्यांचा टोला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – केंद्र सरकारचा आज दिवसभराचा बातम्यांचा केंद्रबिंदू जम्मू – काश्मीर, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान राहिला. जम्मू – काश्मीरवर पंतप्रधानांची सर्वपक्षीय बैठक, शांघाय सहकार्य परिषदेत भारताचा दहशतवादी संघटनांविरोधात कारवाईचा प्रस्ताव आणि अफगाणिस्तानच्या विकासात भारताचे योगदान या वर आज भर देण्यात आला होता. india has brought electricity, dams, schools, healthcare, and community projects to Afghanistan. And the world knows what Pakistan

    पंतप्रधानांच्या निवासस्थानी जम्मू – काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठक सुरू असताना परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानमधील घडामोडी, शांघाय सहकार्य परिषदेतली महत्त्वपूर्ण चर्चा यांची सविस्तर माहिती दिली. बागची म्हणाले, की भारताने अफगाणिस्तानला वीज, धरणे, शाळा, हॉस्पिटल्स, रस्ते, वाहतूक साधने आणि समूदाय विकासाच्या योजना दिल्यात. पण पाकिस्तानने अफगाणिस्तानला काय दिले हे सगळ्या जगाला माहिती आहे, असा टोला त्यांनी लगावला. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याचा मुद्दा अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित होत असतो, याकडे बागची यांनी लक्ष वेधले.

    भारताचा अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप वाढल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी कालच केला होता. त्याला बागची यांनी वरील उत्तर दिले.

    चीनचा सहभाग असलेल्या शांघाय सहकार्य परिषद अर्थात SCO मध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानातल्या लष्कर ए तैय्यबा आणि जैश ए महंमद संघटनांवर कठोर कारवाईचा प्रस्ताव मांडला. SCO framework मध्ये म्हणजे शांघाय सहकार्य परिषदेच्या चौकटीत राहून या दोन्ही दहशतवादी संघटनांवर सदस्य देशांनी कठोर कारवाई करावी. त्यामध्ये बंदीपासून सैनिकी कारवाईपर्यंतचा समावेश असावा असा प्रस्ताव अजित डोवाल यांनी भारताच्या वतीने मांडला. याचे तपशील शांघाय सहकार्य परिषदेच्या सचिवालयामार्फत प्रसिद्ध करण्यात येतील, असे बागची यांनी स्पष्ट केले.

     

     

    india has brought electricity, dams, schools, healthcare, and community projects to Afghanistan. And the world knows what Pakistan

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले