वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने घट होत आहे. परकीय गंगाजळीत सलग सातव्या आठवड्यात घट झाली आहे. RBI ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 16 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलनसाठा $5.22 अब्ज डॉलरने घसरून $545.652 अब्ज झाला आहे. तर यापूर्वी 9 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात तो $550.87 अब्ज होता. 2 ऑक्टोबर 2020 नंतर परकीय चलनाचा साठा त्यांच्या नीचांकी पातळीवर आहे.India Forex Reserve: Foreign exchange reserves fell to a two-year low of Rs 5.22 billion
विदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आरबीआयने डॉलरची विक्री केल्यामुळे परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने घट होत आहे. शुक्रवारी, डॉलरच्या तुलनेत रुपया 81.20च्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आला होता, जो 80.99च्या पातळीवर बंद झाला आहे. सर्व चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला आहे. त्याचबरोबर आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्याने डॉलरचा तुटवडाही जाणवत आहे.
गेल्या सात आठवड्यांपासून परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली आहे. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर परकीय चलनाच्या साठ्यात घसरण सुरूच आहे. मार्चअखेर परकीय चलनाचा साठा $607 अब्ज होता.
परकीय चलनाच्या साठ्यातील घसरणीचा कल कायम राहू शकतो, असे चलन बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. येत्या काही दिवसांत तो $510 अब्जपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.
India Forex Reserve: Foreign exchange reserves fell to a two-year low of Rs 5.22 billion
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर!; पहिली फेरी जिंकली, पण पुढे काय?
- कट्टरतावादी संघटनांची मायावी रूपे : मोपला – खाकसार – रझाकार – SIMI – PFI – SDPI
- ठाण्यात AIMIM कार्यालयावर हल्ला : अज्ञात हल्लेखोरांचा एकाला काठीने मारहाण, दृश्य CCTV मध्ये कैद
- दसरा मेळावा वाद : शिंदे गटाच्या सरवणकरांची हस्तक्षेप याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली