• Download App
    India Fights Back : पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची खरेदी करण्यास पंतप्रधान मोदींची मंजुरी । India Fights Back PM Modi approves purchase of 1 lakh portable oxygen concentrators from PM Care Fund

    India Fights Back : पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीस पंतप्रधान मोदींची मंजुरी

    PM Care Fund : देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यानुसार आता पीएम केअर फंडातून तब्बल 1 लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची खरेदी करण्यात येणार आहे. याशिवाय पीएम केअर फंडामधूनच 500 नवीन PSA ऑक्सिजन प्लांटना मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा मुख्यालय आणि टिअर -2 शहरांमध्ये यामुळे ऑक्सिजन पुरवठा वाढणार आहे. India Fights Back PM Modi approves purchase of 1 lakh portable oxygen concentrators from PM Care Fund


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यानुसार आता पीएम केअर फंडातून तब्बल 1 लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची खरेदी करण्यात येणार आहे. याशिवाय पीएम केअर फंडामधूनच 500 नवीन PSA ऑक्सिजन प्लांटना मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा मुख्यालय आणि टिअर -2 शहरांमध्ये यामुळे ऑक्सिजन पुरवठा वाढणार आहे.

    तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांची भेट घेतली. या बैठकीत हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधानांना कोरोना कालावधीत हवाई दलाने केलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली.

    हवाई दल प्रमुखांशी झालेल्या या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजन टँकर व जीवनावश्यक वस्तूंच्या सुरक्षित आणि वेगवान हालचालीवर भर दिला. ते म्हणाले की, कोरोनाशी संबंधित या मोहिमेदरम्यान हवाई दलाचे जवान सुरक्षितही असावेत याची खबरदारी घेतली पाहिजे. भारतीय वायुसेना (आयएएफ) दुबई आणि सिंगापूरहून नऊ क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर पश्चिम बंगालमधील पानागड विमानतळावर विमानाने आणून दिले आहेत.

    एकाच दिवसात देशात 3,60,960 नवीन बाधितांची नोंद

    देशात कोरोना महामारीमुळे एकाच दिवसात 3,60,960 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या वाढून 1,79,9,267 वर गेली आहेत. बुधवारी सकाळपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आणखी 3293 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांचा आकडा दोन लाखांच्या पुढे गेला आहे. या आकडेवारीनुसार 1,48,17,371 जणांनी आतापर्यंत कोरेानावर मात केली आहे. या आजाराने होणाऱ्या मृत्यूचा दर 1.12 टक्के आहे.

    India Fights Back PM Modi approves purchase of 1 lakh portable oxygen concentrators from PM Care Fund

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??