• Download App
    Corona Vaccine Registration : नोंदणीस सुरुवात होताच क्रॅश झालेले कोविन सर्व्हर पुन्हा सुरू, आरोग्य सेतूने दिले स्पष्टीकरण । Corona Vaccine Registration started again after cowin server crashed at 4 pm today, says Arogya setu

    Corona Vaccine Registration : नोंदणीच्या वेळी क्रॅश झालेले कोविन सर्व्हर पुन्हा सुरू, आरोग्य सेतूने दिले स्पष्टीकरण

    Corona Vaccine Registration : 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी रजिस्ट्रेशनला बुधवारी दुपारी चार वाजेपासून सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयापर्यंत सर्वांना लसीकरणाची मुभा आहे. तथापि, रजिस्ट्रेशनची सुरुवात होताच को-विन सर्व्हर क्रॅश झाले. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी याचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. यात cowin.gov.in वेबसाइटही काम करत नसल्याचे दिसत आहे. अनेक युजर्सनी म्हटलंय की, आरोग्य सेतु, उमंग आणि कोविन अॅपही काम करत नाहीये. दुसरीकडे, आरोग्य सेतुच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंबंधित स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यानुसार संध्याकाळी चार वाजता काही काळासाठी छोटी समस्या आली होती, जी आता ठीक झाली असून 18 वर्षांपुढील सर्वांना नोंदणी करता येईल, असे सांगण्यात आले आहे. Corona Vaccine Registration started again after cowin server crashed at 4 pm today, says Arogya setu


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी रजिस्ट्रेशनला बुधवारी दुपारी चार वाजेपासून सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयापर्यंत सर्वांना लसीकरणाची मुभा आहे. तथापि, रजिस्ट्रेशनची सुरुवात होताच को-विन सर्व्हर क्रॅश झाले. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी याचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. यात cowin.gov.in वेबसाइटही काम करत नसल्याचे दिसत आहे. अनेक युजर्सनी म्हटलंय की, आरोग्य सेतु, उमंग आणि कोविन अॅपही काम करत नाहीये. दुसरीकडे, आरोग्य सेतुच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंबंधित स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यानुसार संध्याकाळी चार वाजता काही काळासाठी छोटी समस्या आली होती, जी आता ठीक झाली असून 18 वर्षांपुढील सर्वांना नोंदणी करता येईल, असे सांगण्यात आले आहे.

    आरोग्य सेतूने ट्वीट करून सांगितले की, ”को-विन पोर्टल काम करत आहे. 4 वाजता छोटासा ग्लिच आला होता, जो आता ठीक झाला आहे. 18 वर्षांहून अधिक वयाचे व्यक्ती रजिस्ट्रेशन करू शकतात.” आरोग्य सेतूने ट्वीटमध्ये एक स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे. यात वेबसाइट काम करत असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यादरम्यान कोट्यवधी भारतीयांचे लसीकरण होणार आहे. हे लसीकरण सरकारी आणि खासगी रुग्णालयांत होणार आहे. यूपी, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्रासहित बहुतांश राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे.

    Corona Vaccine Registration started again after cowin server crashed at 4 pm today, says Arogya setu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Devendra Fadnavis : मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

    Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी

    Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचे 5 दिवसांत 60 लाख फॉलोअर्स; जाहीरनामा प्रसिद्ध- महिलांना 50% आरक्षण, CJI ना राज्यसभेवर पाठवणार नाही