• Download App
    भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या वन डे सामन्यात नामविले; एक हजारावा सामना पडला पदरात । India defected West Indies in their first ODI; One thousandth match was played

    भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या वन डे सामन्यात नामविले; एक हजारावा सामना पडला पदरात

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या वन डे सामन्यात नामविले असून एक हजारावा सामना जिंकला आहे.भारतीय संघाचा विक्रमी १००० वा एकदिवसीय सामना होता. अहमदाबाद येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळविला गेला.या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजाचा पराभव केला. कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच एकदिवसीय मालिका आहे. India defected West Indies in their first ODI; One thousandth match was played

    यजुर्वेद्र चहल (४/४९) आणि वॉशिंग्टन सुंदर (३/३०) या फिरकीपटूंच्या गोलंदाजीमुळे भारताने वेस्ट इंडिजला सहा गडी आणि १३२ चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विंडीजने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य भारताने कर्णधार रोहित शर्मा (६० धावा), सूर्यकुमार यादव (नाबाद ३४) आणि पदार्पणवीर दीपक हुडा (नाबाद २६) यांच्या योगदानामुळे २८ षटकांत गाठले.



    प्रथम फलंदाजी करताना जेसन होल्डरने (५७) अर्धशतकी झुंज दिल्यामुळे विंडीजला किमान तीन आकडी धावसंख्या गाठता आली. आधी मोहम्मद सिराजने भारताला पहिलं यश मिळवून दिले. त्याने शाई होपला बोल्ड केलं. ब्रँडन किंग-डॅरेन ब्राव्होची जोडी जमणार असं वाटत असतानाच भारताचा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने वेस्ट इंडिजला एकाच षटकात दोन धक्के दिले.

    चहलने पूरनला पायचीत पकडलं.वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डला युजवेंद्र चहलने तंबूचा रस्ता दाखवला आहे. चहलने पोलार्डला क्लीन बोल्ड केलं. चहलने चार तर सुंदरने तीन विकेट घेतल्या. दोघांनी सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तिथेच वेस्ट इंडिजचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला होता. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

    India defected West Indies in their first ODI; One thousandth match was played

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज