• Download App
    भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक 2030 पर्यंत, गगनयान पाठविण्याचीही योजना|India also plans to launch a spacecraft by 2030

    भारताचे स्वत;चे अंतराळ स्थानक २०३० पर्यंत, गगनयान पाठविण्याचीही योजना

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत 2030 पर्यंत एक अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. ते एक प्रकारचे स्टेशन असेल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना दिली.India also plans to launch a spacecraft by 2030

    ते म्हणाले की, 2023 पर्यंत भारताचे गगनयान पाठवण्याची योजना आहे आणि त्यापूर्वी दोन मानवरहित मोहिमा पाठवल्या जातील. त्यांच्या रोबोटिक मिशनचा उल्लेख करून ते म्हणाले की, त्यापैकी एक पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाठवण्यात येईल आणि दुसरे मिशन वर्षाच्या अखेरीस पाठवण्याची योजना आहे.



    सिंग म्हणाले की, गगनयानच्या यशामुळे भारत अमेरिका, चीन आणि रशियाच्या श्रेणीतील चौथा देश बनेल आणि अवकाश क्षेत्रात जगातील आघाडीच्या देशांपैकी एक असेल. इंडियन स्पेस रिसर्चऑर्गनायझेशनच्या यशाचा संदर्भ देत सिंग म्हणाले की,

    गगनयानासोबतच व्हीनस मिशन, सोलर मिशन (आदित्य) आणि चांद्रयानसाठी काम सुरू आहे. ते म्हणाले की, कोविड महामारीमुळे विविध मोहिमांना विलंब झाला. आता पुढील वर्षी चांद्रयान पाठवण्याची योजना आहे.

    India also plans to launch a spacecraft by 2030

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!