• Download App
    Mission 2029: Opposition Outlines 30-Month Protest Strategy to Corner BJP मिशन 2029... विरोधकांचा 30 महिने आंदोलनाचा मोड; राहुल गांधींसह प्रादेशिक नेते भाजपला घेरण्याच्या तयारीत

    Mission 2029 : मिशन 2029… विरोधकांचा 30 महिने आंदोलनाचा मोड; राहुल गांधींसह प्रादेशिक नेते भाजपला घेरण्याच्या तयारीत

    Mission 2029

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Mission 2029 पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आंदोलनात्मक रणनीती आखण्यास सुरुवात केली. बदलते राजकीय वातावरण, जनतेशी संबंधित प्रश्न, आंतरराष्ट्रीय घडामोडी लक्षात घेता जनआंदोलनाची संधी असल्याचे विरोधकांना वाटत आहे.Mission 2029

    या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’सारखी आणखी एक मोठी देशव्यापी यात्रा काढण्याची रूपरेषा तयार केली आहे. आघाडीतील इतर पक्षांनाही सहभागी करून घेतले जाईल. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव,शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि तेजस्वी यादव यांसारखे प्रादेशिक नेते आपापल्या राज्यांत यात्रा काढतील. काँग्रेस ३० महिने आंदोलनाच्या मोडमध्ये राहण्याच्या तयारीत आहे.Mission 2029



     

    इंडिया आघाडीत चार मुद्द्यांवर सहमती

    इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाली.पहिला : ३० महिने सातत्याने आंदोलनात्मक भूमिका. दुसरा- केवळ भाजपाविरोधात नसून सक्षम पर्याय म्हणून सादर करणार. तिसरा – जनतेवर थेट परिणाम करणाऱ्या प्रश्नांना आंदोलनाचा केंद्रबिंदू बनवणे. चौथा- भाजपला राजकीय नकाशा बदलण्यास रोखणे, जातनिहाय जनगणनेनुसार निवडणूक लढेल.

    जन आंदोलन: काँग्रेस डिजिटल संघटन वाढवणार

    काँग्रेसने जनांदोलनाला सोशल स्पेसमध्ये चालवण्यासाठी पक्षाची डिजिटल संघटना उभारण्याचा संकल्प केला. काँग्रेस सोशल मीडियावर आपल्या कार्यकर्त्यांना संघटित करेल. पक्ष कार्यकर्त्यांकडून व्हिडिओ बनवेल. त्यात बेरोजगारी, पेपर लीक, महागाईसारखे मुद्दे प्रमुख विषय असतील.

    निकालानंतर प्रादेशिक पक्षांत असंतोष

    काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, पाच राज्यांच्या निकालांनंतर अनेक प्रादेशिक पक्षांत केंद्र सरकारविरोधात नाराजी वाढली आहे. जनाधार कमी होण्याची भीती त्यांना सतावत आहे.

    Mission 2029: Opposition Outlines 30-Month Protest Strategy to Corner BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BHAVY Yojana : केंद्र सरकारने भव्य योजना सुरू केली; देशभरात 100 औद्योगिक उद्याने तयार केली जातील; ₹33,660 कोटींचे बजेट मंजूर

    योगींचा कायद्याचा बडगा; उत्तर प्रदेशात बकरी ईदच्या कुर्बानीला सार्वजनिक ठिकाणी बंदी; रस्त्यावरचे नमाज पठण बंद म्हणजे बंद!!

    Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; CBI चौकशीची मागणी