• Download App
    INDI alliance ची रणनीती; लढायला अण्णा आणि निवृत्ती न्यायमूर्ती; पंतप्रधान बनणार मात्र राहुल गांधी!!

    INDI alliance ची रणनीती; लढायला अण्णा आणि निवृत्ती न्यायमूर्ती; पंतप्रधान बनणार मात्र राहुल गांधी!!

    मतदान चोरी विरोधात अण्णांना लढायला सांगा; उपराष्ट्रपतीपदासाठी न्यायमूर्तींना मैदानात उतरावा; विरोधकांचे नेते “सुरक्षित” घरी बसवा!!

    लढायला अण्णा आणि निवृत्त न्यायमूर्ती; पंतप्रधान बनणार मात्र राहुल गांधी!!, असली तिरपागडी आणि पळपुटी राजकीय रणनीती INDI alliance मधल्या नेत्यांनी आज समोर आणली. मतदान चोरीच्या विरोधात अण्णांना लढायला सांगा; राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत न्यायमूर्तींना मैदानात उतरवा आणि विरोधकांचे सगळे नेते “सुरक्षित” घरी बसवा!!, अशी “उच्च दर्जाची राजकीय रणनीती” विरोधी पक्षांच्या बुद्धिमान नेत्यांनी आखल्याचे उघड झाले.India alliance

    मतदान चोरी विरोधात राहुल गांधींनी बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा काढली. त्या यात्रेत ते बिहार भर फिरायला लागले‌. पण यात्रेच्या यशस्वीतेची खात्री नसल्यामुळे राहुल गांधींच्या समर्थकांनी मतदान चोरी विरोधात लढायची गळ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना घातली. अण्णांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकपालचा लढा देऊन काँग्रेस प्रणित यूपीए सरकार घालवायला मदत केली होती. त्याची आठवण अचानक काँग्रेसच्या नेत्यांना झाली आणि त्यापैकी काही नेत्यांनी पुण्यात स्वतःचे बिन नावाचे पोस्टर झळकवले. त्यामध्ये त्यांनी अण्णा मतदानाची चोरी व्हायला लागली उठा आणि आंदोलन करा, असे आवाहन केले. त्यावर अण्णा हजारे यांनी काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांचा समाचार घेतला मी आंदोलने केल्यामुळे 10 कायदे झाले. आता माझे वय झाले. अजूनही मीच लढू का??, मीच लढत राहिलो, तर तुम्ही काय करणार??, असा परखड सवाल अण्णांनी सगळ्या विरोधकांना केला. पण गेंड्याच्या कातड्यांच्या कानांवरून तो निघून गेला. विरोधकांनी अण्णांना प्रत्युत्तर दिले नाही.



    – उपराष्ट्रपती पदासाठी निवृत्त न्यायमूर्ती

    एकीकडे सरकारच्या विरोधातला सगळ्या लढा अण्णांच्या गळ्यात घालू पाहणाऱ्या विरोधकांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सुद्धा असलाच प्रकार केला काँग्रेस सकट सगळ्या विरोधी पक्षांनी आपल्या कुठल्याच नेत्याला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायला लावली नाही. कारण त्या निवडणुकीत पराभव होणार हे विरोधकांना माहिती आहे. त्यामुळे आपल्या कुठल्याही नेत्याच्या ऐवजी सगळ्या विरोधकांनी मिळून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची माळ सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या गळ्यात घातली. निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी निवड केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बाकीचे सगळे विरोधी नेते त्या पत्रकार परिषदेला हजर होते, ज्यात खर्गे यांनी सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली.

    – राहुल गांधींची उमेदवारी परस्पर जाहीर

    एकीकडे अण्णांना लढायला सांगणे आणि दुसरीकडे निवृत्त न्यायमूर्तींना निवडणुकीच्या मैदानात उतरवणे, अशी राजकीय खेळी करून काँग्रेसच्या विरोधकांनी आपल्या नेत्यांची कातडी वाचवली. लढ़ने को इतर लोग, और प्रधानमंत्री बनने को राहुल गांधी!! असलाही प्रकार आजच नेमका समोर आला. बिहार मधल्या मतदार अधिकारी यात्रेत तेजस्वी यादवांनी राहुल गांधींची पंतप्रधान पदाची उमेदवारी परस्पर जाहीर करून टाकली. लोकहो, तुम्ही आम्हाला मतदान करा आणि राहुल गांधींना पंतप्रधान करतो असे त्यांनी जाहीर सभेत सांगितले. तेजस्वी यादवांनी बाकी भाषण जोरदार ठोकले, पण INDI alliance मधल्या बाकीच्या नेत्यांची परवानगी न घेता राहुल गांधींची पंतप्रधान पदाची उमेदवारी परस्पर जाहीर करून टाकली. यातून त्यांनी स्वतःला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार काँग्रेसकडून मान्य करून घेतले.

    India alliance leaders keeping themselves safe in fight against Modi government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    INDI आघाडीतल्या नेत्यांना पराभवाची भीती; म्हणून सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींच्या गळ्यात घातली उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी!!

    Lok Sabha : लोकसभेत अंतराळवीर शुभांशू शुक्लांवर विशेष चर्चा; जितेंद्र सिंह म्हणाले- देश अंतराळ मोहिमेचे यश साजरे करत आहे, विरोधकांची नारेबाजी

    नेहरूंनी आधी देशाचे, मग पाण्याचेही विभाजन केले, NDAच्या बैठकीत पीएम मोदींचा हल्लाबोल