विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातल्या निवडणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थातEVMs विरोधात INDI आघाडीची एकी पण राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल मात्र बेकी!! अशी विरोधकांची अवस्था झाली आहे.
INDI आघाडीतले सगळे विरोधी पक्ष आता इथून पुढची निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर नकोच बॅलेट पेपरवरच हवी यासाठी एकमुखाने बोलत आहेत. यातून त्यांनी अर्धी लढाई एकत्र चालवली आहे, पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात एकजुटीने लढायची वेळ आल्यावर मात्र राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल मात्र काँग्रेस नेत्यांची तोंडे एकीकडे, बाकी सगळ्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची तोंडे दुसरीकडे अशी INDI आघाडीची अवस्था झाली आहे.
Devendra Fadnavis : पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन
शरद पवारांच्या निवासस्थानी काल रात्री महाविकास आघाडीतल्या काही पराभूत उमेदवारांची बैठक झाली. त्यामध्ये सुप्रीम कोर्टातले वकील अभिषेक मनू सिंघवी हे उपस्थित होते. या सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधात सुप्रीम कोर्टात शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचे ठरविले. या उपक्रमाला काँग्रेस सकट सगळ्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVMs संदर्भात निकाल देताना विरोधकांना फटकारले होते. सुप्रीम कोर्टाने निकाल पत्रात दिलेले मुद्दे वगळून अन्य मुद्द्यांवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधात याचिका दाखल करायचा निर्णय पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्याला सर्व विरोधकांनी मान्यता दिली.
पण राहुल गांधींच्या नेतृत्वात INDI आघाडीने एकजुटीने सगळीकडे निवडणूक लढवायची या मुद्द्यावर मात्र आघाडीतली बेकी समोर आली. ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका करून INDI आघाडीचे नेतृत्व स्वतः करायची इच्छा दाखवल्याबरोबर शरद पवार, लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव वगैरे नेते ममता बॅनर्जींच्या पाठीशी ठाम उभे राहिले. या सगळ्यांनी ममता बॅनर्जींच्या तडफदार नेतृत्वाची प्रशंसा केली, पण काँग्रेसचे नेते मात्र दुसऱ्या दिशेला तोंड करून उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनी ममतांच्या नेतृत्वाच्या प्रादेशिक मर्यादेवर बोट ठेवले.
INDI alliance unites against EVMs
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन
- Bangladesh : बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या अत्याचाराबाबत मानवाधिकारवाले मूग गिळून गप्प का??
- vishwakarma scheme : केंद्राच्या विश्वकर्मा योजनेपासून लाखो तमिळ युवकांना वंचित ठेवण्याचे तामिळनाडूच्या द्रमुक सरकारचे कारस्थान!
- Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशातील कुल्ली येथे भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली