• Download App
    कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ|Increase in the number of trains due to declining corona patients

    कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ

    देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होऊ लागल्याने भारतीय रेल्वेने गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउन हळूहळूअनलॉक करण्याच्या प्रक्रियेसह प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेकडून काही गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ केली आहे.Increase in the number of trains due to declining corona patients


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होऊ लागल्याने भारतीय रेल्वेने गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउन हळूहळून अनलॉक करण्याच्या प्रक्रियेसह प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेकडून काही गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ केली आहे.

    उत्तर प्रदेश आणि बिहार मधील लोकांची सुविधा पाहता गोरखपुर-पनवेल, दिल्ली-गोरखपूर तसेच छपरा-पनवेल या दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेकडून 12 जून्पासून स्पेशल ट्रेन चालविल्या जाणार आहेत.



    या रेल्वेगाड्या उत्तर प्रदेशातील झासी, कानपुर, लखनौ, प्रयागराज, वाराणसी, सीतापुर, बलिया सारख्या शहरांमधून जाणार आहेत. उत्तर रेल्वेनुसार या समर स्पेशल ट्रेन पूर्णपणे आरक्षित असणार आहेत.

    पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची वाढती संख्या पाहता काही स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार येथील ट्रेनचा समावेश आहे. या गाड्या वांद्रे, अहमदाबाद, छपरा, मऊ, समस्तीपुर, गुवाहाटी, राजकोटसह काही शहरांमध्ये धावणार आहेत.

    Increase in the number of trains due to declining corona patients

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती

    लडाखमध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी; चिनी धोक्याला थेट प्रत्युत्तर!!

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे लखनऊ न्यायालयात सरेंडर, 5 मिनिटांनी जामीन; सैन्यावरील टिप्पणीचा खटला