• Download App
    Modi government काँग्रेसची राजकीय धार बोथट करायचा मोदी सरकारचा निर्णय; राष्ट्रीय जनगणनेत जातनिहाय जनगणनेचा समावेश!!

    काँग्रेसची राजकीय धार बोथट करायचा मोदी सरकारचा निर्णय; राष्ट्रीय जनगणनेत जातनिहाय जनगणनेचा समावेश!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ज्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांनी देशभरामध्ये गदारोळ केला होता, त्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दा केंद्रातल्या मोदी सरकारने उचलून धरून तो राष्ट्रीय जनगणनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेत काँग्रेसचे राजकीय हत्यार बोथट केले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवी यांनी यासंदर्भात माहिती दिली.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्सची बैठक झाली. या बैठकीत संबंधित निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय जनगणना होताना तिच्यातच जातनिहाय जनगणनेचा समावेश करावा, या सूचनेला समितीने मान्यता दिली. त्यामुळे राष्ट्रीय जनगणना होताना तिच्यात जातनिहाय जनगणना समाविष्ट केली जाणार आहे.



    मोदी सरकारच्या हिंदुत्व अजेंड्याला छेद देण्यासाठी राहुल गांधींनी काँग्रेसला प्रादेशिक पक्षांच्या पातळीवर आणून जातनिहाय जनगणनेचा मुद्दा देशात तापवला होता. परंतु त्यामध्ये राहुल गांधींना फारच मर्यादित यश आले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार 54 वरून 99 वर गेले पण त्या पलीकडे काँग्रेसला जातीचा मुद्दा फारसा फायदा देऊ शकला नाही. उलट महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला जोरदार मार पडला. काँग्रेसच्या मागे सरपटत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, जननायक पार्टी वगैरे पक्षांनी मोठा फटका बसला. तरी देखील काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूळ काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम वगैरे पक्षांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा रेटून धरला.

    पण आता मोदी सरकारने विरोधकांच्या हातातले जातनिहाय जनगणनेचे राजकीय हत्यार काढून घेत त्या मुद्द्याचा राष्ट्रीय जनगणनेत समावेश करून टाकला. त्यामुळे आगामी बिहार विधानसभा आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या हातातले राजकीय हत्यार सरकारने काढून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Inclusion of caste-wise census in the national census : Modi government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam attack : पहलगाम हल्ला : NIA च्या तपासात मोठा खुलासा ; अंतर्गत व्यक्तीनेच लोकेशन शेअर केले होते

    Manish Sisodia : मनीष सिसोदिया अन् सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढल्या!

    Navjot Singh Sidhu : नवज्योत सिंग सिद्धू सुरू करणार नवी इनिंग, स्वतःच केला खुलासा