• Download App
    तिरूपती मंदिरातील हारांच्या फुलांपासून होणार उदबत्तीची निर्मिती, देशात घरोघरी पसरणार सुगंध Incense will be made from garlands of flowers in Tirupati temple

    तिरूपती मंदिरातील हारांच्या फुलांपासून होणार उदबत्तीची निर्मिती, देशात घरोघरी पसरणार सुगंध

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद – तिरुमला- तिरुपती देवस्थानच्या (टीटीडी) मंदिरांमध्येन देवांना वाहिल्या जाणाऱ्या फुलांच्या हारांचा वापर उदबत्त्या बनविण्याीसाठी करण्याोत येणार आहे. फुलांच्या सुगंधाच्या उदबत्त्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून विक्रीस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती ‘टीटीडी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. एस. जवाहर रेड्डी यांनी दिली. Incense will be made from garlands of flowers in Tirupati temple

    बालाजी मंदिर परिसरातील लाडू विक्री केंद्र, श्रीफळ केंद्र, गोशाळा, तिरुचन्नूर येथील श्री पद्मावती मंदिर, श्री गोविंदराजस्वामी मंदिर, विष्णू निवासम, श्रीनिवासम आदी ठिकाणी या उदबत्त्या मिळणार आहेत. बंगलोरमधील एका कंपनीच्या सहकार्याने तिरुपती येथे ‘टीटीडी’ उदबत्त्या निर्मिती करणार आहे. तसेच कोइमतूर येथील कंपनीच्या भागीदारीतून विविध १५ प्रकारच्या पंचगव्य उत्पादनेही तयार करणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

    सध्या तिरुपतीचा प्रसाद म्हणून लाडू विकला जातो. हा लाडू केवळ देशातच नव्हे तर साऱ्या जगात प्रसिद्ध आहे. तिरुपतीत येणारा प्रत्येक भाविक हा लाडूचा प्रसाद घेतल्याशिवाय तिरुपती सोडत नाही. आता भविष्यात येथील उदबत्त्यादेखील देशाच्या कानाकोपऱ्यात घरोघरी आपला सुगंध पोहोचवतील.

    Incense will be made from garlands of flowers in Tirupati temple

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे